girlfriend commits suicide after boyfriend refuses to marry 
पिंपरी-चिंचवड

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीची आत्महत्या 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : लग्नाचे आश्‍वासन देऊन नंतर प्रियकराने लग्नास नकार देत शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला. यामुळे आलेल्या नैराश्‍यातून प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना निगडी येथे घडली. याप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल झाला आहे. धनंजय बाळासाहेब राऊत (वय 23, रा. मोरेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या तरूणीच्या आईने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांच्या 21 वर्षीय मुलीला तिचा प्रियकर धनंजय याने लग्नाचे आश्‍वासन दिले होते. मात्र, नंतर लग्नास नकार देत तरूणीला शिवीगाळ करीत मानसिक त्रास दिला. यामुळे ती तणावात व नैराश्‍यात असायची. या नैराश्‍यातून तिने 23 जानेवारीला दुपारी पावणे एकच्या सुमारास निगडी, ओटास्कीम येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, आत्महत्येपुर्वी तरूणीने दोन चिठ्ठ्या लिहिल्या होत्या.त्यामध्ये धनंजय याने फसवणूक केल्याचे नमूद असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, तरूणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी धनंजय याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT