Grandmother burn to her granddaughter hand for playing with the neighbor daughter in pimpri 
पिंपरी-चिंचवड

मोठ्यांची भांडणं, लहानग्यांना त्रास; शेजाऱ्यांच्या मुलीबरोबर खेळणाऱ्या नातीला आजीने दिले चटके

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पूर्वी भांडण झालेल्या मुलीसोबत खेळायला जाते म्हणून सत्तर वर्षीय महिलेने नऊ वर्षीय नातीला झारा गरम करून चटके दिले. त्यात चिमुकलीच्या पायाला, हाताला, तोंडाला इजा झाली आहे. हा धक्कादायक प्रकार विठ्ठलनगर झोपडपट्टी, लांडेवाडी येथे घडला. याप्रकरणी आजीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचा - चला भटकायला ; पुण्यातले किल्ले, ऐतिहासिक वास्तू खुल्या 

प्राची उर्फ जान्हवी प्रदीप गायकवाड (वय 9) असे जखमी मुलीचे नाव आहे. प्राचीची आई सारिका प्रदीप गायकवाड (वय 33, रा. विठ्ठलनगर झोपडपट्टी, लांडेवाडी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जडिता विश्वनाथ वाघमारे (वय 70, रा. विठ्ठलनगर झोपडपट्टी, लांडेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आजीचे नाव आहे. आरोपी जडिता ही फिर्यादी सारिका यांची मावशी आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सारिका यांची मुलगी प्राची ही तिची मैत्रीण तनिष्का सोबत खेळायला जात असे. तनिष्काच्या कुटूंबासोबत आरोपी जडिता हिचे भांडण झाले होते. प्राची ही तनिष्का सोबत खेळायला जाते, याचा जडिता हिला राग येत असे. त्यावरून 30 डिसेंबरला दुपारी बारा वाजता जडिताने प्राचीची मोठी बहीण साक्षी हिला प्राचीला धरून आणण्यास सांगितले. साक्षीने प्राचीला धरून आणल्यानंतर जडिताने गॅसवर झारा गरम करून प्राचीच्या पाय, हात, तोंड आणि गालाला चटके देऊन जखमी केले. याबाबत सहा दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT