Chandrakant Patil kishor aware sakal
पिंपरी-चिंचवड

Chandrakant Patil : पालकमंत्री पाटील यांच्याकडून आवारे कुटुंबीयांचे सांत्वन

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची गेल्या शुक्रवारी तळेगाव नगरपरिषदेच्या आवारात निघृण हत्या करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव स्टेशन : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची गेल्या शुक्रवारी तळेगाव नगरपरिषदेच्या आवारात निघृण हत्या करण्यात आली.या पार्श्‍वभूमीवर राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (ता.१६) दुपारी दिवंगत किशोर आवारे यांच्या तळेगावातील निवासस्थानी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.पाटील यांनी आवारे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन श्रद्धांजली वाहीली.

दिवंगत किशोर आवारे यांच्या हत्याकांडांतील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी आवारे कुटुंबीयांनी याप्रसंगी पाटील यांच्याकडे केली. आवारे कुटुंबीयांना धीर देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले कि, किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणी तपास योग्य दिशेने चालू असून,तपास यंत्रणा वाढवत आहोत.

आवारे कुटुंबीयांना न्याय दिला जाईल.आवारे हत्या प्रकरणातील गुन्हेगार किती मोठा असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.माजी राज्य मंत्री संजय भेगडे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,आवारे यांचे मामा उद्योजक रामदास काकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction : जडेजाची कॉपी! CSKने उगाच १४ कोटी नाहीत मोजले, प्रशांत वीरचे Six एकदा बघाच... Video Viral

Prithvi Shaw : ती खोटारडी...! पृथ्वी शॉ मुंबई न्यायालयात पोहोचला, सादर केलं प्रतिज्ञापत्र; आता कोणता नवा कांड केला?

कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय तुम्हीच घ्या, खातं कुणाला द्यायचं सांगा; मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादांना स्पष्टच विचारलं

Latest Marathi News Live Update : महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

VIDEO : 1 मिनिट 43 सेकंदांचा Video थेट भिडतोय हृदयाला..; माकडांसाठी 'आई' बनलीये महिला, पोटच्या पोरांप्रमाणं लावतेय जीव, तुम्हीही व्हाल भावूक

SCROLL FOR NEXT