Sandeep Waghere
Sandeep Waghere Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी येथील ‘एचए’ कंपनीस लस निर्मितीची परवानगी द्यावी; संदीप वाघेरे

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी (Pimpri) येथील हिंदुस्तान अ‍ॅन्टिबायोटिक्स कंपनीस (HA Company) १०० कोटी रुपयांची आर्थिक मदत (Financial Help) करावी. तसेच केंद्र व राज्य सरकारशी चर्चा करून शहरवासीयांना मोफत लस (Free Vaccine) व रेमडेसिव्हिर इंजेक्शन (Remdesivir Injection) उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे (Sandip Waghere) यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय, राज्य व स्थानिक लोकप्रतिनिधींना दिल्या आहेत. (HA Company at Pimpri should be allowed to manufacture vaccines)

महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका कार्यक्षेत्रातील या कंपनीला लस निर्मिती करण्याची परवानगी केंद्र शासनाकडून घ्यावी. वेळप्रसंगी हाफकिन  इन्स्टिट्यूटबरोबर भागीदारी (टायअप) करावी. तसेच महापालिकेने लस घेण्यासाठी कंपनीला सुमारे १०० कोटी रुपये आर्थिक सहकार्य करावे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोफत लस व रेमडेसिव्हिर अथवा कोरोना महामारीला लागणारी औषधेही मिळतील. तसेच कंपनीच्या ४५० कामगारांना आणि कंपनीलाही अडचणीच्या व वाईट काळात मदतीचा हात मिळेल. कंपनीच्या निवृत्त झालेल्या व येणेबाकी असलेल्या १२५ कामगारांनाही आर्थिक मदतीचा हात मिळेल.

पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका यांनी कंपनीला  स्वहिस्सा व केंद्र व राज्य सरकारच्या वतीने आर्थिक  मदत करावी. ही मदत झाल्यास कंपनीत रेमडेसिव्हिरसारखी औषधे तयार होतील. तसेच कंपनीत पावडर स्वरूपात औषध बनविणाऱ्या मशिनरींबरोबरच लिक्विड स्वरूपात लस, औषधे बनविणाऱ्‍या अद्ययावत मशिन युद्धपातळीवर लावून लस बनविण्याची केंद्र शासनाकडून परवानगी घेतल्यास कंपनीचे पुनरुज्जीवन होईल. आयुक्त या नात्याने सरव्यवस्थापकांशी बोलून राज्य व केंद्राशी चर्चा करावी  आणि  जलदगतीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT