chating sakal
पिंपरी-चिंचवड

अनोळखींशी चॅटिंग घाई, दाखवते नैराश्याची खाई

शेअर केलेले ‘तसले’ फोटो व्हायरलच्या धमक्या देत आर्थिक लुबाडणूक

मंगेश पांडे

पिंपरी : ‘‘व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करत असताना मी तिच्यात गुंतत गेलो. ती माझीच झाली असे समजत राहिलो, ती सांगेल तसे करत राहिलो. दरम्यान, तिने मला निर्वस्त्र पहायचे असल्याचे सांगत, व्हॉट्सअॅप कॉल करण्यास सांगितले आणि मी फसलो. स्क्रीनशॉट काढलेले माझे फोटो दुसऱ्या मिनिटाला माझ्याच मोबाईलवर आले.

तसेच पैसे पाठव नाही तर फोटो व्हायरलची धमकी येण्यास सुरुवात झाली. घाबरून दहा हजार रुपये पाठवलेही; पण पुन्हा पैशांची मागणी होऊ लागली. समाजात बदनामी होईल या भीतीने गाव सोडून जाण्यासह आत्महत्येचा विचारही मनात आला...’’ पस्तिशीतील नितीन (नाव बदललेले) आपल्यावर गुजारलेला प्रसंग पोलिस अधिकाऱ्यांना सांगत असतो.

सोशल मीडियावर झालेली ओळख व त्यातून झालेली मैत्री अनेकांना जीवघेणी ठरत आहे. लोकांना आपल्या जाळ्यात ओढून पैशांची मागणी करण्याचे प्रकार वाढत आहेत. असे उद्योग करणाऱ्या टोळक्याच्या उद्योगाला अनेकजण बळी पडत आहेत. ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात अडकलेल्यांना काय करावे काहीच सुचत नाही. पोलिसात तक्रार द्यावी अथवा कोणाला काही सांगायचे म्हटले तरी बदनामीची भीती अशी दुहेरी कोंडी होते.

यातून काहीजण पैसे पाठवत राहतात, पण मागणी थांबत नाही. मग भीतीतून प्रचंड नैराश्याच्या खाईत लोटले जाते. काहीजण सर्व अकाउंट, फोन बंद ठेऊन काहीशी सुटका करून घेतात. मात्र, तरीही मनात भीती कायमच राहते. नितीनसारखे फार कमी लोक पोलिसात तक्रार देऊन प्रकार थांबवितात.

आरोपींमध्ये तरुणींचाही समावेश

तरुणाशी संवाद साधणे, गप्पा मारणे, त्याच्यावर प्रेम असल्याचा बनाव करणे असे प्रकार तरुणीमार्फत केले जातात. मात्र, नंतर व्हिडिओ शूटिंगचे स्क्रीनशॉट पाठवून पैसे उकळण्याच्या उद्योगात काही तरुणांचाही समावेश असल्याचे दिसून येते. तर, काही घटनांमध्ये केवळ तरुणांचे टोळके मिळूनच असे उद्योग करीत असल्याचे समोर येते.

गेल्या वर्षी १०६, तर या वर्षात ४० घटना

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या वर्षी अशा १०६ तर या वर्षात ४० घटना घडल्याचे समोर आले. मात्र, बदनामीच्या भीतीने सर्वच जण पोलिसात तक्रार करीत नाहीत. ठरावीकच जण पाठपुरावा करतात.

बदनामीची भीती

अशा प्रकारांमुळे व्यक्ती प्रचंड घाबरतात. समाजात, कुटुंबात, नातेवाइकांत बदनामी होण्याची भीती सतावते. यामुळे टोकाचा निर्णय घेण्याचे विचारही त्यांच्या डोक्यात घोंघावतात. या भीतीने अद्यापपर्यंत ३० ते ४० जणांनी पैसेही दिले आहेत. यातील काही जणांनी तक्रार केली तर काहींनी नाही केली. दोघांनी पन्नास हजार तर एकाने एक लाख रुपये दिलेत.

असे ओढले जाते जाळ्यात -

-मुलींच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट

-मग मेसेंजरवरून संवाद साधत व्हॉट्सअप नंबर शेअर

-पर्सनल चॅटिंग करत मोहात पाडणे

-नंतर निर्वस्त्र पाहायची इच्छा व्यक्त करतात

-कॉल करताच स्क्रीन शॉट काढले जातात.

हे करा-

-सोशल मीडियाचे पूर्ण ज्ञान असल्याशिवाय हाताळू नका

-आपल्याशी संवाद साधणाऱ्या व्यक्तीची पूर्ण माहिती असावी

-आमिषाला बळी पडू नका

-आपण काय कृती करतोय याचे भान ठेवा

-अशा घटना घडल्यास शांत डोक्याने विचार करून जवळच्या व्यक्तीशी संवाद साधा

अनेकदा मुलींच्या नावाचे बनावट प्रोफाइल असते. दुर्दैवाने यास बळी पडले असल्यास घाबरून जाऊ नका. यातूनही मार्ग निघतो. पोलिसात तक्रार द्या, आरोपीचा शोध घेऊ, तसेच संबंधित तरुणाला मार्गदर्शन करू. अशा घटनेतील सर्वच फोटो अपलोड करतील असे नाही. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. - संजय तुंगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT