Corona Patient 
पिंपरी-चिंचवड

पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर; पाहा सविस्तर आकडेवारी

सकाळवृत्तसेवा

पुणे -  पुणे शहरात शनिवारी (ता.२०) एकाच दिवसात तब्बल ३ हजार १११ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. हीच जिल्ह्यातील एका दिवसातील रुग्णांची संख्या साडेपाच हजारांजवळ पोचली आहे. ही नवीन रुग्णांची आकडेवारी पाहता,  पुण्यात कोरोनाने अक्षरशः कहर माजविल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यात एकाच दिवसात ५ हजार ४७३ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. आजच्या एकूण रुग्णांमध्ये शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये  १ हजार ४३१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ६६८,  नगरपालिका हद्दीत १९४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ६९ नवे  रुग्ण सापडले  आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, आज दिवसभरात  २ हजार १३८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील १ हजार ९४, पिंपरी चिंचवडमधील ६२३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २९०, नगरपालिका क्षेत्रातील १०९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील २२ रुग्णांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त दिवसभरात  २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील सर्वाधिक १६  जण आहेत. तसेच पिंपरी चिंचवडमधील सात, जिल्हा परिषद व  नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ९ हजार ५३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४५३ जण जिल्ह्याबाहेरील आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

Education News : शिक्षक भरतीचा मोठा निर्णय! शिक्षण आयुक्त कार्यालयाचे अधिकार काढून परीक्षा परिषदेकडे सुपूर्द

बापरे! अर्जुननंतर अस्मितासमोर येणार सचिनच्या अफेअरचं सत्य; सासूबाईंसमोरच साक्षीला करतोय किस

महापालिका निवडणुकांआधी मोठा राजकीय बॉम्ब! ठाकरे बंधूंनंतर आता अजून एक भावांची जोडी एकत्र येणार? दलित मतांचे एकत्रीकरण होणार

New Year Calendar : एका वर्षांत का असतात 12 महिने? 11 किंवा 10 का नाही..'या' राजाच्या निर्णयाने बदललं जगाचं कॅलेंडर, थक्क करणारी माहिती

SCROLL FOR NEXT