Sambar Animal Sakal
पिंपरी-चिंचवड

Crime News : राहत्या घरातून सांभर प्रजातीची शिंगे कवटी जप्त

घरातील हॉलमध्ये, बंगल्यांच्या बैठक खोलीत, दर्शनी भागात शोभेची वस्तू अथवा बडेजाव म्हणून काहींना अँटिक पीस, काही इंपोर्टेड वस्तू, जंगली प्राण्यांची शिंगे, दाते, हाडे, कातडे, सांगाडा, मुखवटे लावण्याचा शौक असतो.

सकाळ वृत्तसेवा

घरातील हॉलमध्ये, बंगल्यांच्या बैठक खोलीत, दर्शनी भागात शोभेची वस्तू अथवा बडेजाव म्हणून काहींना अँटिक पीस, काही इंपोर्टेड वस्तू, जंगली प्राण्यांची शिंगे, दाते, हाडे, कातडे, सांगाडा, मुखवटे लावण्याचा शौक असतो.

हिंजवडी - घरातील हॉलमध्ये अथवा बंगल्यांच्या बैठक खोलीत, दर्शनी भागात शोभेची वस्तू अथवा बडेजाव म्हणून काहींना अँटिक पीस, काही इंपोर्टेड वस्तू, जंगली प्राण्यांची शिंगे, दाते, हाडे, कातडे, सांगाडा, मुखवटे लावण्याचा शौक असतो. मात्र, हाच हव्यास आपल्याला किती भारी पडू शकतो याची प्रचिती थेरगावातील एका उद्योजकावर आली. त्याने घरात सांभर प्रजातीच्या प्राण्याची शिंगे व तोंडाचा सांगाडा लावल्याने मुळशी वनविभागाने त्याच्या घरावर छापा मारत कारवाई केली.

मुळशीच्या वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार थेरगावातील शिव कॉलनी लेन नंबर २बी, मधील सुरेश आप्पा नाईक धनश्री बंगलोवर मुळशीचे वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच घोटावडे येथील वनपाल यांच्यासह वनविभागाच्या पथकाने धाड मारून घराची झडती घेतली असता, सांभर प्रजातीच्या वन्यप्राण्याची शिंगे तोंडाच्या सांगाड्यासह आढळून आली. प्रथमदर्शनी सदर शिंगे लाकडापासून तसेच पीओपी असून घरामध्ये शोपीस म्हणून बनवलेली लावलेली असा आभास निर्माण करण्यात आला.

परंतु सांगाडा ताब्यात घेऊन तपासणी केली असता सदरची शिंगे हि सांभर प्राण्याचीच असल्याचे आढळून आले. आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता सदर शिंगे हि २० वर्षांपासून घरामध्ये असल्याचे कबुल केल्याने आरोपी यांचावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ चे कलम ३९, ५०, ५१ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई मुळशी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल घोटावडे प्रज्ञा बनसोडे, वनरक्षक पांडुरंग कोपणार, संतोष मुंडे व कर्मचाऱ्यांनी केली.

सुरेश आप्पा नाईक (वय-७४), किरण सुरेश नाईक (वय-४७) रा. धनश्री डुप्लेक्स बंगलो, शिव कॉलनी, लेन २बी, थेरगाव), या बाप लेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वन्यजीवांची शिकार करणे, तस्करी करणे किंवा वन्यजीवांचे अवशेष जवळ बाळगणे हा वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत गुन्हा असून ७ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा किवा द्रव्यदंड किंवा दोन्ही होऊ शकतात. अशा घटना निदर्शनास आल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा किंवा वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ वर कळवावे.'

- संतोष चव्हाण (वनपरिक्षेत्र अधिकारी, पौड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Semi Final : २२ वर्षीय Phoebe Litchfield भारी पडली; पेरी, गार्डनर यांची तुफानी खेळी, भारतासमोर ३००+ धावांचे लक्ष्य

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

IND vs AUS Semi Final : हिला, झोडायला टीम इंडियाच मिळाली होती! Phoebe Litchfield चा वर्ल्ड रेकॉर्ड अन् दोन भारी विक्रम

Delhi Riots 2020 Update : ‘’अचानक नव्हता उफळला दिल्लीत हिंसाचार, सत्ता बदलण्यासाठीचा तो होता कट’’ ;पोलिसांचा दावा!

Rohit Arya News: नाराजी सरकारवर; पण माथेफिरूचा मुलांच्या जीवाशी खेळ, पडद्यामागची फिल्मी गोष्ट आली समोर

SCROLL FOR NEXT