krishna prakash 
पिंपरी-चिंचवड

गृहमंत्री सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला शंभर कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे देतील - कृष्ण प्रकाश

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - राज्याचा गृहमंत्री सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला शंभर कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे देतील, टार्गेट दयायचेच असेल तर पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना देतील, त्यामुळे यात तथ्य वाटत नाही, जे अधिकारी चुकीचे काम करतात, त्यांनाच टार्गेट दिले जाते, असे पिंपरी -चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले. तसेच पिंपरी चिंचवड शहर भयमुक्त करणे, हेच आमचे टार्गेट असून चुकीला माफी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना दरमहा शंभर कोटी रुपयांचे टार्गेट दिले होते, असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील एका कर्मचाऱ्यानेही काही दिवसांपुर्वी अशाप्रकारे एक पत्र दिल्याचे समोर आले होते. त्या पत्रात कोट्यवधी रुपयांच्या हप्ता वसुलीचा उल्लेख करण्यात आला होता. दरम्यान, मुंबई पोलिस दलातील शंभर कोटी वसुलीच्या पत्राबाबत कृष्ण प्रकाश यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, जे अधिकारी चुकीची कामे करतात, त्यांनाच असे टार्गेट दिले जाते.

चुकीची कामे न करणाऱ्या अधिकार्यांना टार्गेट कसे दिले जाईल. चुकीची कामे करतात म्हणून तर त्यांना टार्गेट दिले जाते. सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला असे टार्गेट दिले जाऊ शकत नाही. टार्गेट द्यायचेच असेल तर आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला देतील. त्यामुळे गृहमंत्री सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला टार्गेट देणे म्हणजे हे मनाला न पटणारे आहे. 

दरम्यान, पिंपरी -चिंचवड शहर भयमुक्त करणे, हेच आमचे टार्गेट आहे. शहरात कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही. गुन्हेगार कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी, कार्यकर्ता किंवा समर्थक असू सोडणार नाही. कोणत्याही चुकीला माफी नाही, असा इशाराही कृष्ण प्रकाश यांनी दिला. 

तसेच पिंपरी -चिंचवड शहरातील वसुलीबाबतच्या व्हायरल पत्राचा तपास ‘सीआयडी’कडे असल्याने  त्यावर आपण भाष्य करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

free Seed Scheme: मोफत बियाण्यासाठी ३०-३५ किमी हेलपाटे; कृषी विभागाच्या भोंगळ नियोजनाने शेतकरी संतप्त, निलंग्यात कृषी विभागाविरोधात नाराजी

Latur Farmer: अधिकारी फोटो काढून गेले अन्... मदतीचा बैलही निघाला आजारी; लातूरच्या शेतकऱ्याच्या दु:खाला अंतच नाही!

Akola News: मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचाही बुडून मृत्यू; धार्मिक स्नान ठरले अखेरचे, समशेरपूर येथील घटना!

OnePlus Turbo 6X Pro मोबाईलची धमाकेदार एन्ट्री! चक्क 8000mAh एवढी मोठी बॅटरी; लॉन्च होताच डिस्काउंट, किंमत फक्त...

Latest Marathi News Live Update : विदर्भात उष्णतेचा कहर कायम; पुढील चोवीस तासांसाठी धोक्याचा इशारा

SCROLL FOR NEXT