Home Post Facility for Submitting Digital Life Certificate through India Post Payments Bank Postman 
पिंपरी-चिंचवड

पोस्टाकडून घरपोच जीवनपोच जीवन प्रमाणपत्र

आशा साळवी

पिंपरी : इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक (आयपीपीबी) पोस्टमनच्या माध्यमातून डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (डीएलसी) सबमिट करण्यासाठी घरपोच सुविधा प्रदान केली आहे. या माध्यमातून आतापर्यंत 300 पेन्शरांनी सुविधेचा लाभ घेतला असून सध्याच्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पेन्शनरांना घरपोच सुविधा नक्कीच उपयुक्त ठरत आहे.

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात निवृत्ती वेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. ते मिळविण्यासाठी राज्य केंद्र व निमसरकारी तसेच बॅंकांमधून निवृत्त झालेल्या पेन्शनर धारकांना धावपळ करावी लागते. आता त्यांची धावपळ कमी करण्यासाठी निवृती वेतनधारकांसाठी टपाल विभागामार्फत विशेष सेवा देण्यात आली आहे. घरपोच टपाल द्यायला येणाऱ्या पोस्टमन यांच्यामार्फत पेन्शनर्स जीवन प्रमाणपत्र देण्यास सुरवात केली असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी के. एस. पारखी यांनी दिली. टपाल कार्यालयातील सर्व पोस्टमन यांना स्मार्ट फोन व बायोमेट्रिक मशीन दिले आहेत. पोस्टमन घरी आल्यानंतर ७० रुपये शुल्क आकारून मोबाईल ऍपद्वारे डिजिटल लाइफ सर्टिफिकेटची नोंद करता येणार आहे. 

पेन्शनर त्यांच्या मोबाईल फोनवर 'पोस्ट इन्फो' ऍप डाऊनलोड करून आपली विनंती नोंदविल्यावर त्यांना जीवनप्रमाणपत्र घरपोच मिळत आहे. त्यासाठी पेन्शन व्यक्तीने पेन्शनर प्रकार, वितरण एजन्सी, पेन्शन पेमेंट ऑर्डर, पेन्शन खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक सांगणे अपेक्षित आहे. मोबाईल नंबर लिंक केल्याने पेन्शनर व्यक्तीला मोबाईल क्रमांक लिंक केल्यामुळे एसएमएसद्वारे डिजिटल प्रमाणपत्र अपलोड आल्याची माहिती मिळते, त्याचा लाभ अधिकाधिक ज्येष्ठांनी घ्यावा, असे आवाहन डाकघर पुणे शहराचे प्रवार अधीक्षक मुकुंद बडवे यांनी केले आहे.


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : सौरव गांगुलीला ED ची नोटीस अन् घरावर छापे? भारताचा माजी कर्णधार संतापला; थेट पोलिसात तक्रार, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पुण्यातील सिंहगड रोडवरील दुकानांना भीषण आग

Pune News: पुनावळेतील ९१ गुंठ्यांचा शैक्षणिक भूखंड खासगी संस्थेला; स्थानिक नगरसेवकांच्या विरोधानंतरही प्रस्ताव मंजूर, महापालिकेच्या सभेत मोठा निर्णय!

Accident: चालकाचा ताबा सुटला अन्..., १६ प्रवाशांच्या बसचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

Mulank : 'या' 3 मुलांकाचे लोक सतत आजारी पडतात, शनीच्या साडेसातीमुळे रोज येतात नव्या अडचणी, पाहा यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT