पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडकरांनो, हिवतापापासून दूर राहण्यासाठी अशी घ्या काळजी

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पावसाच्या पार्श्‍वभूमीवर हिवताप, डेंगी व चिकनगुनिया या किटकजन्य रोगांच्या साथी उद्‌भवू नये, म्हणून काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे. हिवताप हा आजार एनॉफिलस व डेंगी, चिकनगुनिया हे आजार पसरविण्यास एडिस इजिप्ताय हे डास कारणीभूत असतात. या बाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्‍यक असून, डासोत्पत्ती कमी करून नियंत्रणात ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घरात पाण्याची साठवण करणे, घराभोवतीच्या परिसरात साचलेले सांडपाणी डासांच्या वाढीस उपयुक्त असते. या पाण्यात अळ्या वाढतात, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो म्हणून डासांची उत्पत्ती होऊन नागरिक आजारी पडतात. हिवताप, डेंगी किंवा चिकनगुनिया झालेल्या व्यक्तीस डास चावला, तर रोग्याच्या रक्तातील हिवताप, डेंगी, चिकनगुनियाचे विषाणू त्या डासांच्या शरीरात शिरतात असा डास निरोगी व्यक्तीलाही आजारी करतो. त्यामुळे शहरात पावसाळ्यात हिवताप, डेंगी, चिकनगुनियासारखे रोग पसरू नयेत म्हणून वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी डासोत्पत्ती स्थानावरील नियंत्रणाची माहिती नागरिकांपर्यंत पोचवून सामाजिक प्रबोधन व जनजागरण करणे आवश्‍यक असल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने जनजागृती सुरू केली आहे. 

हे करा... 

  • घरात पाणी साठविण्याची सर्व भांड्यातील पाणी वापरून रिकामी करून कोरडी करा. 
  • घरातील मोठ्या टाक्‍या, ज्या रिकाम्या करता येणे शक्‍य नाहीत, त्यांना घट्ट झाकण बसवायचे आहे. 
  • घरातील फ्लॉवर पॉट, कुलर व फ्रिजचा खालचा ट्रेमधील पाणी दर आठवड्यास रिकामे करावयाचे आहे. 
  • घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार मालाची विल्हेवाट लावायची आहे. 
  • घराभोवती पाण्याची डबकी असतील, तर ती बुजविणे किंवा त्याठिकाणी पाणी वाहते करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT