पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड : आधीच कोरोनाची भीती, त्यात 'या' त्रासाने वाढली नागरिकांची डोकेदुखी!

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरात गेल्या दोन दिवसांपासून विविध भागात अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. परिणामी, नागरिकांना पोटदुखी व अतिसाराचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. एकीकडे कोरोना व दूसरीकडे असह्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, महापालिकेने अशुद्ध पाणीपुरवठ्याला दुजोरा दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. शहरातील निगडी, भोसरी, दिघी, रुपीनगर, संभाजीनगर, बोपखेल, तळवडे, पिंपरी, संत तुकारामनगर, सांगवी, शाहूनगर या परिसरात नागरिकांना पाण्यातून बाधा झाली आहे. याच भागातील नागरिकांनी स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी महापालिकेकडे धाव घेतली आहे. याबाबत शेकडो तक्रारी आल्याचे समजत आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाणीपुरवठा विभागाने तक्रारीनंतर पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली आहे. यात क्‍लोरिनचे प्रमाण योग्य असल्याचे समजते आहे. त्याचप्रकारे खासगी पाण्याच्या लॅबमधूनही पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्या अहवालातूनही पाण्यात कोणतेही जिवाणू नसल्याचे समोर आले आहे. मात्र, नागरिकांनी पाणी गाळून व उकळून पिणे अत्यावश्‍यक असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे याबाबत म्हणाले, "पाण्याचा शुद्ध पुरवठा सुरू आहे. याबाबत पाण्याचे नमुने देखील तपासले आहेत. अशुद्ध पाण्याने नव्हे, तर वातावरणातील बदलामुळे देखील त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर नागरिकांची पचनशक्ती व इतर संसर्गजन्य परिस्थिती याचाही विचार करणे गरजेचे आहे. पाण्यातून नागरिकांना कोणतीही बाधा होत नाही. त्यासाठी पाण्याची अणुजीव तपासणी देखील केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT