चंदन कोलोजियम सोसायटी मधील नियोजित विलगीकरण कक्ष. 
पिंपरी-चिंचवड

कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी सोसायटीत तयार केला विलगीकरण कक्ष

सागर शिंगटे

पिंपरी - वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येने वैद्यकीय सेवेवर ताण येत असताना कस्पटे कॉर्नर येथील छोट्याशा चंदन कोलोजियम सोसायटीने मोठी "दिशा' दाखविली आहे. सोसायटीतील संभाव्य कोरोगाग्रस्त सभासदांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरु करण्याची तयारी सोसायटीकडून केली जात आहे. मात्र, त्यासाठी त्यांना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून मार्गदर्शक सूचनांची देखील प्रतिक्षा आहे. 

शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका प्रशासन झगडत आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येचा ताण वैद्यकीय सेवेवरही पडत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, कस्पटे कॉर्नर येथील चंदन कोलोजियम सोसायटीने वेगळाच पुढाकार घेतला आहे. मुंबईच्या धर्तीवर सोसायटीच्या रिफ्युजी एरियात विलगीकरण कक्ष सुरु करण्याचे प्रयत्न व्यवस्थापन समितीकडून केले जात आहे. सोसायटीचे खजिनदार विवेक जाधव, सभासद दिनेश यादव यावेळी उपस्थित होते. 

सोसायटीचे सचिव समीर बारपांडे म्हणाले, 'मुंबईमध्ये रुग्णालयांमध्ये रुग्णाला दाखल करण्यास जागाच राहिलेली नाही. त्यातूनच, सोसायट्यांमध्येच विलगीकरण कक्ष करण्याचा विचार सुरु झाला आहे. हे लक्षात घेऊन आम्ही देखील सोसायटीच्या सभासदांसाठी विलगीकरण कक्ष सुरु करणार आहोत. त्यादृष्टीने, कामही चालू झाले आहे. सोसायटीतील काही भाडेकरु बाहेरगावी गेले आहेत. तर इंदूर, कर्नाटक येथील भाडेकरु परत येऊ लागले आहेत. त्यांना घरातच "होम क्वारंटाईन' करण्यात आले आहे.

अजून काही भाडेकरु येणे बाकी आहेत. त्यामुळे, संभाव्य अति सौम्य किंवा सौम्य कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष करता येईल काय? यादृष्टीने, आम्ही काम करत आहोत. सोसायटीतील सुमारे 1 हजार चौरस फूटांतील रिफ्युजी एरियात हा विलगीकरण कक्ष तयार केला जाणार असून त्यासाठीचा खर्च सोसायटीतील सभासद उचलणार आहेत. परंतु, आम्ही त्यासाठी याबाबत महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांची वाट पाहत आहोत.'' 

सभासद नीलेश सोनटक्के म्हणाले, 'या कक्षाची रंगरंगोटी करुन तेथे खिडक्‍यांना जाळ्या बसविण्यात येणार आहेत. पिण्याचे पाणी आणि टॉयलेटची सुविधा दिली जाणार आहे. 2 ते 3 खाटांची सोय केली जाणार आहे. याशिवाय, या सभासदांच्या मनोरंजनाची सोय देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सोसायटीच्या सभासदांच्या संमतीने आणि सामंजस्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सभासद वासुकीनाथ झा म्हणाले, 'माझ्या फ्लॅटसमोरच्या मोकळ्या रिफ्युजी एरियात हा कक्ष तयार केला जाणार आहे. त्यामुळे, दुदैवाने, एखादा सभासद कोरोनाबाधित झाल्यास त्याला या कक्षात ठेवता येईल. तसेच त्याच्या कुटूंबियांच्या देखरेखीखाली त्याला आवश्‍यक गोष्टीही पुरविता येईल. त्याने, रुग्णाच्या प्रकृतीतही लवकर सुधारणा होऊ शकेल.'' 

'पुण्या-मुंबईच्या धर्तीवर सोसायट्यांमधील क्‍लब हाऊस किंवा जादाच्या शिल्लक फ्लॅटमध्ये स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरु करणे शक्‍य आहे. त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना कळविल्या जातील..''
- डॉ.पवन साळवे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Politics: जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय भूकंप! उमर अब्दुल्लांची खुर्ची धोक्यात? नॅशनल कॉन्फरन्समध्ये काय घडतय

Sanjay Gupta Passed Away: शूटआउट अ‍ॅट वडाळा फेम दिग्दर्शक संजय गुप्ता यांचं निधन, वयाच्या ५९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Global Warming: जागतिक तापमानवाढीचा वेग दुप्पट; पृथ्वीच्या तापमानात दशकात 0.35 अंशांनी वाढ

Geetanjali Chavan Success Story : सिंधुदुर्गची कन्या चमकली! वडिलांचं छत्र हरपलं, पण जिद्द नाही सोडली; गीतांजलीची सुरक्षा दलात निवड, वाचा प्रेरणादायी कहाणी

Marathi News Live Updates : नितेश कराळेंना मिळालेली मते भाजपची नव्हती, पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर भाजपचे आत्मपरीक्षण

SCROLL FOR NEXT