PCMC Sakal
पिंपरी-चिंचवड

आयटीआय बंद, तरी साहित्य खरेदीचा घाट; महापालिकेचा दुसरा प्रकार समोर

कोरोना संकटकाळी महापालिकेची औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) बंद आहे. तरीदेखील मध्यवर्ती भांडार विभागाने तारतंत्री व वीजतंत्री या दोन ट्रेडकरता ८ कोटीच्या साहित्य खरेदीचा घाट घातला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोना संकटकाळी महापालिकेची औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) बंद आहे. तरीदेखील मध्यवर्ती भांडार विभागाने तारतंत्री व वीजतंत्री या दोन ट्रेडकरता ८ कोटीच्या साहित्य खरेदीचा घाट घातला आहे. टुल किट्स इक्विपमेंट मशिनरीसाठी निविदा प्रक्रीया राबविण्यात आली आहे. या विभागाचा कोरोना काळात अनावश्यक खरेदीचा दुसरा प्रकार समोर आला आहे.

कोरोना परिस्थितीत गेल्या वर्षापासून सर्व शिक्षण संस्था, औद्योगिक व्यावसायिक शिक्षण संस्था, विविध विभाग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आयटीआय सुरू होतील यात शंका आहे. अशा परिस्थितीमध्ये मध्यवर्ती भांडार विभागाने महापालिकेच्या आयटीआयमधील वीजतंत्री व तारतंत्री ( विभाग अ व ब ) या व्यवसायाकरिता आवश्यक टुल किट्स, इक्विपमेंट, मशिनरी साहित्य खरेदीचा घाट घातला आहे.

साहित्य पुरवठा करून ‘टर्न की प्रोजेक्ट’ कार्यान्वित करून घेण्यासाठी इच्छुक उत्पादित कंपनी अथवा पुरवठाधारक यांच्याकडून निविदा मागवित प्रक्रीया राबवली. त्यापैकी एक ६, ४२, ७७, २७२ रुपयांची निविदा प्रसिद्ध करून ता. २२.०१.२०२१ ते ११.०२.२०२१ या काळात प्रक्रिया राबविण्यात आली, तर दुसरी २, ०१, ७७, ४२२ रुपयांची निविदा प्रसिद्ध करून ता.१०.०३.२०२१ ते २६.०३.२०२१ या काळात प्रक्रिया राबविण्यात आली. शहरातील नागरिकांच्या वैद्यकीय व आरोग्य सुविधा वर खर्च करण्यासाठी महापालिकेची तारेवरची कसरत सुरू आहे. दुसरीकडे मात्र अशा शाळा-महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था बंद असताना भांडार विभागाकडून अनावश्यक खरेदी नेमकी कोणासाठी केली जात आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT