पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड : बोऱ्हाडेवाडीतील शाळेत नववी, दहावीचे वर्ग भरणार 

सकाळवृत्तसेवा

मोशी : बोऱ्हाडेवाडी येथील महापालिकेच्या कै. महादू श्रीपती सस्ते मुला-मुलींच्या शाळेत पहिले ते आठवीच्या वर्गांबरोबरच आता नववी व दहावीचे वर्गही भरणार आहेत. या नवीन दोन वर्गांना महापालिका शिक्षण मंडळाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे.

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
स्थानिक नागरिकांसह परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील मध्यमवर्गीय व गोरगरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी येथील ही शाळा सुरू करण्यात आली. त्यात पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र, त्यानंतरच्या पुढील शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या न परवडणाऱ्या खासगी शाळांमध्ये जावे लागत होते. याही विद्यार्थ्यांची दहावीपर्यंतच्या पुढील शिक्षणाची सोय याच शाळेत व्हावी, यासाठी स्थानिक नागरिकांनी या प्रभागातील नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार सारिका बोऱ्हाडे यांनी महापालिका शिक्षण समितीकडे येथील शाळेत नववी व दहावीचे वर्गही सुरू करून त्यास मान्यता मिळावी असा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शिक्षण समितीनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 

येथील शाळेत नववी व दहावीचे वर्गही सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार समितीकडे प्रस्ताव सादर करीत पाठपुरावा करून हे वर्ग मंजूर करून घेतले आहेत. यामुळे या शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षणही मिळणार असून, पुढील शिक्षणासाठी नागरिकांना खासगी शाळांमध्ये जावे लागणार नाही. नागरिकांची मागणी पूर्ण करू शकल्याने समाधान वाटत आहे. 
- सारिका बोऱ्हाडे, नगरसेविका 

आगामी शैक्षणिक वर्षापासून नववीचा वर्ग सुरू करण्यात येणार असून, त्यानंतर दहावीचा वर्गही सुरू करण्यात येईल.
- भारती रिठे, मुख्याध्यापिका, कै. महादू श्रीपती सस्ते शाळा 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT