Residential photo 
पिंपरी-चिंचवड

नेहरूनगर कोविड सेंटरममधून मृत रुग्णाचे दागिने चोरीला

दोन गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : नेहरूनगर(Neharunagar) येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये(Jumbo Covid centar) दाखल केलेल्या कोरोना बाधित(corona Positive) रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे दागिने(Jewlery) व मौल्यवान वस्तू चोरीला(Theft) गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी(Pimpri) पोलिस(Police) ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.(Jewelry was stolen from a dead patient at Nehru Nagar Jumbo Covid Center)

सागर दिवाकर गुजर (रा. बोपखेल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या आई सितल दिवाकर गुजर (वय ६१) यांना १४ एप्रिलला उपचारासाठी नेहरूनगर जम्बो कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले. १९ एप्रिलला उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. दरम्यान, सितल गुजर यांचे मंगळसूत्र, कानातील फुल, सोन्याची अंगठी, दोन चांदीच्या अंगठ्या असा एकूण ४१ हजारांचा ऐवज चोरीला नेला.

दुसऱ्या घटनेत वैष्णवी ज्योतिबा खुळे (वय २०, रा. पिंपळे निलख) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी खुळे यांचे मामा प्रशांत विश्वनाथ मोरे (वय ४०, मरकळ रोड, आळंदी) हे कोरोनाबाधित झाल्याने त्यांना २५ एप्रिलला नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान प्रशांत मोरे यांचा एक मे रोजी मृत्यू झाला. मोरे यांच्यासोबत असलेला त्यांचा दहा हजारांचा मोबाईल फोन त्यांच्या नातेवाईकांना मिळाला नाही. जम्बो कोविड सेंटर मधून अज्ञात व्यक्तीने त्यांचा मोबाईल फोन चोरला असल्याची फिर्याद देण्यात आली आहे. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT