पिंपरी : लॉकडाउनच्या काळात अचानकपणे नोकरीवरून कमी केलेल्या आयटीयन्सनी सरकार दरबारी तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारचे यावर तातडीने मार्ग काढावा म्हणून नोकरी गेलेल्या आणि पगार कमी झालेल्या आयटीयन्सनी एकत्र येऊन याबाबत दाद मागण्यासाठी 'जस्टीस फॉर एम्प्लॉइज' हे अनोखे अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्वतःचा फोटो असलेला आयटीयन्सची पोस्टर तयार करुन ती थेट मंत्रालयामध्ये पाठवण्यात येणार असल्याचे नॅशनल इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेटचे सरचिटणीस हरप्रीत सलुजा यांनी सांगितले.
आतापर्यंत आयटीयन्सकडून आलेल्या तक्रारींमध्ये कामावरुन कमी केलेल्या तक्रारीची संख्या बऱ्यापैकी आहे. याखेरीज पगार कपात आणि पगाराची रक्कम न दिल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. पुण्यातील कामगार आयुक्त कार्यालयाकडे याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, त्यावर अद्याप अंतिम निर्णय लागत नसल्याने आयटीयन्स हैराण झाले आहेत. त्यामुळे अशा आयटीयन्सना एकत्र करुन त्याची कैफियत थेट राज्य सरकारकडे मांडण्यासाठी हे अनोखे अभियान हाती घेण्यात आल्याचे सलुजा यांनी नमूद केले.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
नोकरी जाणे, पगार न मिळणे, पगार कपात अशा परिणामांचा फटका बसलेल्या आयटीयन्सनी त्यांचे पूर्ण नाव, फोन नंबर, कंपनीचे नाव, इमेल, ठिकाण या माहिती बरोबरच स्वताचा फोटो याची माहिती संघटनेकडे पाठवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 500 ते 600 जणांनी माहिती कळवली असून त्यांचे पोस्टर तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अभियानात सहभागी होण्यासाठी आयटीयन्सना यासाठी चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर नॅशनल इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेटने यासर्वाची पोस्टर तयार करुन त्यावर जस्टीस फॉर एम्प्लॉइज अशा आशयाचा मजकूर लिहून ही सर्व पोस्टर्स पुढल्या आठवड्यात राज्य सरकारकडे पाठवण्याचे नियोजन केल्याचे सलुजा यांनी स्पष्ट केले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, कर्मचाऱ्यांचे पगार कमी करु नका, त्यांना कामावरुन काढू नका, अशा सूचना सरकारकडून मार्च महिन्यातच आयटी कंपन्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र, सरकारच्या आदेशाला हरताळ फासत असे प्रकार करणे सुरुच ठेवले आहे.
केंद्र सरकारचेही लक्ष वेधणार...
जस्टीस फॉर एम्प्लॉइज अभियान सर्वप्रथम महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे, त्यानंतर हळूहळू त्याची व्याप्ती देशभर वाढवण्याचे नियोजन करण्यात आले असून लवकरच त्याला सुरुवात होणार असल्याचे सलुजा यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.