पिंपरी-चिंचवड

किती आहे मावळातील धरणांमध्ये पाणीसाठा?

ज्ञानेश्वर वाघमारे

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील सर्वच धरणांमध्ये लक्षणीय पाणीसाठा वाढू लागला आहे. पूर्व पवन मावळातील कासारसाई धरण भरले असून, त्यातून बाराशे क्यूसेस एवढा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मावळ तालुक्यात सुमारे दीड महिना पावसाने दडी मारली होती. अति पावसाचा समजला जाणारा जुलै महिना कोरडा गेला होता. धरणातील पाणीसाठाही कमी होऊ लागला होता. गेल्या वर्षी लांबलेला पावसाळा व लॉकडाउनमुळे औद्योगिक व व्यावसायिक कमी झालेला पाणी वापर यामुळे धरणांमध्ये जेमतेम परंतु, पुरेसा पाणीसाठा शिल्लक होता. अन्यथा पाणीकपातीची वेळ केव्हाच आली असती. गेल्या सोमवारपासून पावसाचे पुनरागमन झाल्याने पाणीकपात तूर्तास टळली आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. ओढे-नाले व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. भात खाचरेही पाण्याने भरली आहेत. या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. मावळसह पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात सुमारे ५७ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण परिसरात आतापर्यंत ९३५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. दोन दिवसात सहा टक्के वाढ झाली आहे. नाणे मावळातील वडिवळे धरणात ७३ टक्के पाणीसाठा झाला आहे. दिवसभरात ९१ मिलीमीटर, तर एक जूनपासून एक हजार २४७ मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती उपअभियंता मनोहर खाडे यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आंदर मावळातील आंद्रा धरणात ८९ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात एकूण ७४.३७ दशलक्ष घनमीटर, तर ७३.८१ दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा झाला आहे. दिवसभरात ३५ मिलीमीटर, तर एक जूनपासून ५६६ मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती शाखा अभियंता ए. आर. हांडे यांनी दिली. पूर्व पवन मावळातील कासारसाई धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यात १७.१५ दशलक्ष घनमीटर एकूण, तर १५.८३ दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा आहे. धरणातून एक हजार २०० क्युसेस याप्रमाणे विसर्ग सुरू केला आहे. येथे एक जूनपासून ५९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पवना वगळता आंद्रा व वडिवळे धरण दोन-तीन दिवसातच भरण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

SCROLL FOR NEXT