पिंपरी-चिंचवड

मावळात एकूण रुग्ण संख्येपैकी ६५ टक्के रुग्णांची कोरोनावर मात

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात गुरुवारी दिवसभरात ४० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर दोघांचा मृत्यू झाला. वडगाव येथील ६० वर्षीय पुरुष व पिंपळखुंटे येथील ५७ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या एक हजार २९५, तर मृतांची संख्या ४७ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्यातील सुमारे ६५ टक्के म्हणजेच ८३८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ४० जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक १४, वडगाव व लोणावळा येथील प्रत्येकी चार, कामशेत व धामणे येथील प्रत्येकी तीन, ऊर्से व इंदोरी येथील प्रत्येकी दोन; तर कुसगाव बुद्रुक, वराळे, कान्हे, बऊर, वडेश्वर, देवघर, बेबडओहळ व शिवणे येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक हजार २९५ झाली असून, त्यात शहरी भागातील ६५७ व ग्रामीण भागातील ६३८ जणांचा समावेश आहे. तळेगाव येथे सर्वाधिक ४२०, लोणावळा येथे १४०, तर वडगाव येथील रुग्ण संख्या ९७ झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ८३८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी १४ जणांना घरी सोडण्यात आले. 

तालुक्यात सध्या ४०९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २७५ जण लक्षणे असलेले व १३४ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २७५ जणांपैकी १९१ जणांमध्ये सौम्य, तर ६८ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १५ जण गंभीर व एक जण अत्यवस्थ आहे. सध्या ३८७ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असून, २२ जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

SCROLL FOR NEXT