Pimpri Crime Sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri Crime : पिंपरीत कोयता गँगची दहशत; दुकानात घुसून विक्रेत्यावर कोयत्याने वार

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : पुण्यातील कोयता गँगनंतर आता पिंपरी चिंचवडमध्येही कोयता गँगची दहशत वाढताना दिसत आहे. पिंपरीत एका मेडिकलमध्ये शिरून विक्रेत्यावर कोयत्याने वार करीत दुकानाची तोडफोड केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

पिंपरीतील अशोक थिएटरजवळील मेडिकल दुकानात हातात धारदार कोयते घेऊन शिरलेल्या टोळक्याने विक्रेत्यावर हल्ला चढविल्याचे दिसत आहे. यासह दहशत माजवत दुकानाचीही तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यात कोयता गँगने दहशत माजवल्याचे प्रकार समोर आले होते. विधिमंडळताही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यामुळे पोलिसांनी कडक पावले उचलत मोठ्या प्रमाणात कारवाई केली.

दरम्यान, आता पिंपरी-चिंचवडमध्येही कोयता गँगने डोके वर काढल्याचे दिसत आहे. यामुळे शहरवासीयांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बघलं कोणीतरी आम्ही नाही जा! सुकन्या मोनेंनी सादर केली ठसकेबाज लावणी, सोशल मीडियावर Video Viral

Accident News : येवल्याजवळ भीषण अपघात: भरधाव फॉर्च्युनर पलटी; तीन साईभक्तांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : मुंबईतील KEM रुग्णालयात डॉक्टरवर चाकूने जीवघेणा हल्ला

Bank Director Rule : वर्षांनुवर्षे सहकारी बँकेत तळ ठोकलेल्या संचालकांना बसणार दणका! आमदार, खासदारांना फटका

Shreyas Iyer ने दुखापतीनंतर पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल...'

SCROLL FOR NEXT