Large action on unauthorized construction in the old sangvi 
पिंपरी-चिंचवड

बेकायदा ईमले भुईसपाट; जुनी सांगवीत अनधिकृत बांधकामांवर मोठ्या कारवाई 

रमेश मोरे

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील मुळा नदी किनारा रस्ता भागात पिंपरी-चिंचवड महापालिका बांधकाम अतिक्रमण विरोधी पथकाकडून मोठ्या फौज फाट्यासह कारवाई सुरू करण्यात आली. येथील मुळानगर  भागातील एका तीन मजली इमारतीला खाली घेत सुरूवात केली. यात मोठा फौजफाटा पाहून  नागरीक व बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. येथील कारवाई दोन दिवस चालणार असून यात एकुण १७ बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. यात संगमनगर येथील ३ बांधकामे,मुळानगर मुळानदी किनारा रस्ता १, शिंदे नगर ३, मधुबन सोसायटी ५ अशा एकुण १७ बांधकामांवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.यापुर्वी या बेकायदा बांधकामाला वेळोवेळी नोटीस बजावण्यात आल्या होत्या.तर यातील काही बांधकामे तुर्तास बांधण्यात आलेली आहेत.

सकाळी साडेदहा वाजता कारवाई सुरु करण्यात आली.मुळानदी किनारा परिसरात मोठा फौजफाटा पाहून नागरीक व बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. येथील कारवाई करण्यात आलेल्या इमारतीत दोन कुटुंब राहायला होती. घरमालक अधिकाऱ्यांच्या सुचनेनंतर तात्काळ इमारत आधीच खाली करण्यात आली होती.

- Valentine Special: 'फिल माय लव्ह', आर्याची जादू आजही कायम!​

मधुबन सोसायटी गल्ली क्र.५ व इतर बेकायदा बांधकामांवर ही कारवाई होणार असल्याने नागरीकांमधून भीतीचे वातावरण पहायला मिळाले. मधुबन येथे गतवर्षी या भागात काही ९५ च्या डीपी प्लॅननुसार येथील १८ मीटररस्ता बाधित घरांवर काही प्रमाणावर कारवाई करण्यात आली होती.तर काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने यावरील कारवाई काही काळ थांबविण्यात आली होती. तर काही महिन्यांपूर्वी येथील १८ मीटर रस्त्याची संयुक्त प्राथमिक संयुक्त मोजणी करण्यात आली होती. यात रस्ता व बाधितक्षेत्र मोजून त्यांचे विवरण व रहिवासी नागरीकांच्या हरकती व आक्षेपावर अजून काम सुरू आहे.

आजपासून सुरु केलेली कारवाई ही बेकायदा बांधकामां विरोधात असल्याचे अधिकाऱ्यांनकडून सांगितले. बेकायदा बांधकामांना अभय कोणाचे अशी चर्चाही नागरीकांमधून ऐकायला मिळत होती तर बेकायदा बांधकामाबाबत सलग दोन दिवस सुरु राहणार आहे. या कारवाईत बाबत महापौरांशी संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही.  बुधवार(ता.10), गुरूवार(ता.11) महापालिकडून येथील १७ बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे. पालिका अतिक्रमण पथकात अधिकारी व   पोलिस मिळून १०० जणांनी कारवाईत भाग घेतला. यात ६ जेसीबी,२ पोकलेन, ४ ट्रॅक्टर ब्रेकर, डंपरच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली.

- 'एक हजारों में मेरी बहना है!'; बहीण सरपंच होताच भावानं दिलं मोठं गिफ्ट

''सुनिल भागवानी कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. सलग दोन दिवस ही कारवाई सुरू राहणार असून बेकायदा बांधकामधारकांना यापुर्वीच नोटीस दिलेल्या आहेत.''
- राजेंद्र डुंबरे उप अभियंता महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT