लक्ष्मण जगताप  sakal
पिंपरी-चिंचवड

लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबियांची महत्त्वाची माहिती

प्रकृतीत सुधारणा होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

विजय गायकवाड : सकाळ वृत्तसंस्था

पिंपळे गुरव : गेल्या आठवडाभरापासून चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर बाणेर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हळूहळू ते उपचाराला प्रतिसाद देत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहीती त्यांचे बंधू शंकर जगताप यांनी दिली आहे. गेली आठवडाभरापासून पिंपळे गुरव,जुनी सांगवी,नवी सांगवी व शहर परिसरात भाऊंच्या आरोग्यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.

त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलल्याचे वातावरण पहावयास मिळत आहे. या आठवडाभरात केंद्र तसेच राज्यातील भाजपा व इतर पक्षातील नेत्यांनी रुग्णालयात येऊन तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आमदार जगताप यांच्या तब्येतीविषयी आस्थेने चौकशी केली. त्याचबरोबर शहरातील विविध सामाजिक संस्था, मंडळे, महिला व कार्यकर्ते यांच्याद्वारे विविध ठिकाणी देवदेवतांच्या मंदिरामध्ये जाऊन अभिषेक पूजा व महामृत्युंजय मंत्राचा जप करत आमदार जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

दरम्यान केंद्रीय मंत्री, भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार, रामदास आठवले दूरध्वनीद्वारे आमदार जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्याशी संवाद साधत प्रकृतीविषयी विचारपूस केली. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री राम शिंदे, संजय भेगडे, आमदार आशिष शेलार, राहुल कुल, भीमराव तापकीर, महेश लांडगे, माधुरी मिसाळ, सुनील शेळके, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी महापौर उषा ढोरे यांच्यासह शहरातील भाजपा व अन्य पक्षातील शहर पातळीवरील नेत्यांनी रुग्णालयात येऊन जगताप बंधूंची भेट घेतली. यावेळी विजय जगताप, शंकर जगताप तसेच रुग्णालयाच्या डॉक्टरांशी संवाद साधत आमदार जगताप यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

सर्व स्तरातून करण्यात आलेली प्रार्थना, जनतेचे आशीर्वाद, वरिष्ठ नेत्यांनी दिलेला आधार याबद्दल आमदार जगताप यांचे बंधू शंकर जगताप व विजय जगताप यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.भाऊंच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे बंधू शंकर जगताप यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT