पिंपरी : प्रत्येकाने मास्क वापरणे हेच एक प्रकारचे लॉकडाउनसारखे आहे. तरीही शहरात लॉकडाउन करण्यासंबंधी पालकमंत्री, खासदार, आमदार, महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पदाधिकारी, अधिकारी व खाजगी रुग्णालय प्रमुखांची कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. त्यात आयुक्त बोलत होते. महापालिकेचा वैद्यकीय विभाग व शहरातील सर्व खासगी रुग्णालय प्रमुखांच्या अडचणी, खासगी रुग्णालयांत किती बेड शासन निर्देशानुसार उपलब्ध आहेत, याचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आयुक्त हर्डीकर म्हणाले, "कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील काही दिवसांत प्राथमिक टप्प्यामध्ये जास्त प्रमाणात नागरिकांच्या संपर्कामध्ये येणारे भाजीपाला, फळे, मांस विक्रेते, घंटागाडी कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. प्रत्येकाने मास्क वापरणे आवश्यक असून, ते न पावरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्राचा आवश्यकतेनुसार विस्तार करण्यात येणार आहे. काही कंपन्यांमध्ये कामगारांत सुरक्षित अंतर ठेवले जात नसल्याचे आढळून आले आहे. अशा कंपन्यांवर कारवाई केली आहे.''
महापौर ढोरे म्हणाल्या, "आयुक्तांच्या आदेशाचे अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही परिस्थितीत रुग्ण संख्येत वाढ होऊ नये, यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करावे. सद्यःस्थितीत कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. तरीही, नागरिक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. कोरोना नियंत्रणासाठी कठोर उपाययोजनांची गरज आहे.'' सत्त्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, "सर्व खाजगी रुग्णालयात महापालिकेचा हेल्पडेस्क तातडीने तयार करावा. किती बेड वापरले, किती रिकामे आहेत, याची माहिती डेस्क वर्करद्वारे दररोज वॉर रूमला देण्यात यावी.''
अशा आहेत उपाययोजना
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक अभिषेक बारणे, सागर आंगोळकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रविण तुपे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, मनोज लोणकर, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, रुग्णालय प्रमुख डॉ. सुनील जॉन, डॉ. प्रकाश ताडे, डॉ. सुनिता इंजिनियर, डॉ. विजया आंबेडकर, डॉ. तृप्ती सांगळे, डॉ. विणादेवी गंभीर, डॉ. संगीता तिरुमणी, डॉ. शैलेजा भावसार, डॉ. सुनिता साळवी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.