पिंपरी-चिंचवड

आयटी कंपन्यांसाठी हे आहेत लॉकडाउनचे नियम...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरात कोरोना संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी सोमवार (ता. 13) मध्यरात्रीपासून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पुन्हा दहा दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केला. यातील पहिले पाच दिवस 14 ते 18 जुलैपर्यंत कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. तर, नंतरचे पाच दिवस 19 ते 23 जुलै काही प्रमाणात शिथिलता आणली जाईल. या कालावधीत आयटी कंपन्यांनी 15 टक्के  कामगार उपस्थित ठेवायचे आहेत. किंवा वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडायचा आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. 

लॉकडाउनचे पहिले पाच दिवस (ता. 14 ते 18 जुलै) कडकडीत बंद असेल. त्यानंतर थोडी शिथिलता आणली जाईल. आयटी कंपन्या 15 टक्के कर्मचारी उपस्थित राहू शकतील. वर्क फ्रॉम होमचा पर्याय खुला. कंपन्यांना कामगारांसाठी स्वतःचे चारचाकी वाहन किंवा निश्‍चित केलेल्या बसमधून प्रवासाला परवानगी आहे. शहरातील कंपन्या चालू राहतील. कामगारांची वाहतूक चारचाकी वाहनातूनच पास घेऊन करायची आहे. कंपनीतच दहा दिवस निवास व्यवस्था केल्यास संपूर्ण परवानगी कंटेन्मेंट झोनबाहेरील कामगाराच असावेत.

  • ई-पास epaas.addl2@pcmcindia.gov.in  येथे उपलब्ध होईल. औद्योगिक व इतर वस्तुंची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक स्थानिक, आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक नियमानुसार सुरू राहील. जीवनावश्यक वस्तू, औषधं, तयार अन्न घरपोच सेवा सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत सुरू राहील. 
  • 65 वर्षांवरील व मधुमेह, रक्तदाब, दमा, यकृत, मुत्रपिंड, कर्करोग, एचआयव्ही बाधित व्यक्ती, गरोदर महिला व दहा वर्षांखालील मुले यांनी अत्यावश्‍यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. 
  • विनाकारण फिरताना आढळल्यास गुन्हा दाखल केला जाईल. वाहन जप्त करून परवाना रद्द केला जाईल.
  • दुध विक्री, वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा, रुग्णालये, मेडिकल दुकाने 24 तास, अत्यावश्‍यक सेवेसाठी पेट्रोल पंप (सकाळी 9 ते दुपारी 2), घरपोच गॅस सिलिंडर सेवा, पाणी टॅंकर, वर्तमानपत्रे छपाई व वितरणास परवानगी. मात्र, सकाळी सहा ते नऊ या वेळेत वितरण होईल.

लॉकडाउनमध्ये हे बंधनकारक 

  • मास्कचा वापर करणे
  • सामाजिक अंतर राखणे
  • एकत्र न जमणे (अंत्यसंस्काराला वीस जणांनाच परवानगी  )
  • सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे

कामाच्या ठिकाणांबाबत... 

  • घरातूनच काम करणे अथवा कामाच्या कामकाजाच्या वेळेची योग्य आखणी करावी.
  • थर्मल स्क्रीनिंग, हँडवाश, सॅनिटायझर असावे.
  • कामाच्या ठिकाणचे वारंवार 
  • सॅनिटायझेशन करणे.
  • कर्मचाऱ्यांमध्ये योग्य अंतर, दोन शिफ्टमध्ये पुरेसा वेळ, जेवणाच्या सुट्टीचे नियोजन याबाबत कार्यालयप्रमुखांनी दक्षता घ्यावी.

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar Cabinet : डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात तब्बल 20 नव्या चेहऱ्यांची एन्ट्री! पाहा, कोणत्या आमदारांचं उजळलं नशीब? शपथविधीची वेळही ठरली!

Team India New Coach: गौतम गंभीरच्या टीममध्ये मोठा बदल! श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघासाठी नव्या कोचची घोषणा

Lowest Home Loan: बँक ऑफ महाराष्ट्रची 'मान्सून धमाका' ऑफर! होम लोनच्या व्याजदरात कपात आणि इतर सुविधा; मात्र 'ही' अट आवश्यक

Latest Marathi News Live Update : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात २९११७ क्युसेक विसर्ग करण्यात येणार, नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा

Ulhasnagar Accident: ट्रकची एकामागोमाग सात वाहनांना धडक, चालक फरार; थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT