hos.jpg
hos.jpg 
पिंपरी-चिंचवड

वडगावमध्येही आजपासून लॉकडाउन; प्रांताधिकाऱ्यांचा आदेश

सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत प्रांतांच्या आदेशानुसार २३ जुलै पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष कंमयुर ढोरे व मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी दिली. दरम्यान, बुधवारी दुपारी हा आदेश आल्यानंतर शहरात लागलीच त्याची अंमलबजावणी करण्यात आली. व्यावसायिक व व्यापाऱ्यांनीही सर्व दुकाने बंद करून प्रतिसाद दिला.

वडगाव शहरात कोरोना रुग्ण आढळल्याने तसेच परिसरातील इतर गावातील नागरिक खरेदीसाठी वडगाव बाजारपेठेत गर्दी करत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात १३ ते २३ जुलै दरम्यान लॉकडाऊन करण्याचा आदेश जारी करावा असा प्रस्ताव मुख्याधिकारी ओगले यांनी प्रांत संदेश शिर्के यांना ११ तारखेला पाठवला होता. त्यानुसार शिर्के यांनी बुधवारी याबाबतचा आदेश जारी केला. वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये पाच करोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याने १३ ते २३ जुलैपर्यंत संपूर्ण वडगाव शहर प्रतिबंधित झोन म्हणून जाहीर केले आहे.

त्यामुळे १८ जुलै पर्यंत मेडिकल दुकाने व दवाखाने सोडून इतर सर्व आस्थापना बंद राहतील. १९ जुलै पासून फक्त अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत सुरू राहतील. इतर सर्व दुकाने व आस्थापना पूर्ण बंद राहतील. घरपोच दूध वितरण सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत, बँकिंग सुविधा सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू असेल. या आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष ढोरे व मुख्याधिकारी ओगले यांनी केले आहे. दरम्यान, नियम न पाळणांऱ्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिला आहे. 

शहरात लागलीच अंमलबजावणी-
दरम्यान, बुधवारी दुपारी प्रांतांचा आदेश आल्यानंतर नगरपंचायत व पोलिस प्रशासनाने लागलीच त्याची अंमलबजावणी केली. व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार शहरातील सर्व व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून प्रतिसाद दिला. गजबजलेल्या बाजारपेठेत लागलीच शुकशुकाट निर्माण झाला.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT