Lohegaon Airport
Lohegaon Airport sakal
पिंपरी-चिंचवड

Lohegaon Airport : इमारतींच्या उंचीला लोहगाव विमानतळामुळे लगाम

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - सरकारच्या आदेशानुसार शहरातील इमारतींना उंचीची मर्यादा नाही. मात्र, लोहगाव विमानतळामुळे उंचीवर मर्यादा आलेली आहे. शिवाय, अग्निशामक दलाचा ना-हरकत परवानाही आवश्यक आहे. विमानतळ प्राधिकरण, अग्निशामक दलाच्या अटी व शर्तीनुसार महापालिका किवळे, रावेत भागात १२० मीटर उंचीपर्यंत इमारतींना परवानगी देऊ शकते. आतापर्यंत शंभर मीटर उंचीपर्यंत इमारतींना परवाना दिलेला आहे.

शहरात राहायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे घरांना मागणीही वाढली आहे. ती पूर्ण करण्यासाठी घरांची विशेषतः गगनचुंबी इमारतींची पर्यायाने सदनिकांची संख्याही वाढत आहे. त्यासाठी अधिकाधिक उंच इमारती उभारल्या जात आहेत.

मात्र, लोहगाव विमानतळ शहराजवळच असल्यामुळे आणि शहरात काही कंपन्यांचे खासगी हेलिपॅडही असल्यामुळे इमारतींच्या उंचीला मर्यादा आल्या आहेत. तसेच, अग्निशामक दलाकडे तितक्या उंचीची शिडी किंवा तसे वाहन असणेही गरजेचे आहे.

त्यामुळे बांधकाम परवानगी देताना महापालिका बांधकाम परवाना विभाग, अग्निशामक दलाचे ना-हरकत प्रमाणपत्रही बघत असते. बांधकाम परवानगी प्रस्तावासोबत परवानाधारक आर्किटेक्ट, अभियंता अर्थात सर्वेअरचे प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यासाठी महापालिकेने आर्किटेक्ट, अभियंत्यांना परवाने दिलेले आहेत.

क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अधिकार

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये एक एकरापर्यंत बांधकाम परवान्याचे अधिकार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल आहेत. त्यापुढील क्षेत्रावरील बांधकामांना बांधकाम परवाना विभागाकडून अभियंतास्तरावर परवानगी दिली जाते. यासंदर्भात तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी परिपत्रक काढले होते.

त्यापूर्वी सर्व बांधकाम परवानगीचे अधिकार उपअभियंता, कार्यकारी अभियंता, सहशहर अभियंता आणि शहर अभियंता यांना विभागून दिले होते. उपअभियंत्यांकडे २० गुंठ्यांपर्यंत अर्थात एक एकर पर्यंतच्या बांधकामांना, तर त्यापुढील बांधकामांना सहशहर अभियंत्यांकडे परवानगी देण्याचे होते.

आता त्यामध्ये बदल केला आहे. त्यानुसार एक एकरापर्यंतच्या बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आहेत. महापालिकेची आठ क्षेत्रीय कार्यालये असून, आठ क्षेत्रीय अधिकारी आहेत.

‘बांधकामांना आता उंचीची मर्यादा नाही. मात्र, इमारतीची उंची किती ठेवायची, याबाबत अग्निशामक दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. शिवाय, विमानतळाच्या परिसरात बांधकामांच्या उंचीबाबत काही अटी व शर्ती आहेत. त्याच्या अधीन राहून परवाना दिला जातो. सध्या १२० मीटरपर्यंत आपण परवानगी देऊ शकतो. मात्र, आतापर्यंत शंभर मीटर उंचीपर्यंत बांधकामाची परवानगी दिली आहे.

- मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका

अशी आहे स्थिती

  • २४४ - महापालिका परवानाधारक आर्किटेक्ट

  • २३५ - महापालिका परवानाधारक अभियंता किंवा सर्वेअर

बांधकाम परवाना देण्याची पद्धत

  • एक एकरपर्यंत बांधकामे - कनिष्ठ अभियंता- उपअभियंता- क्षेत्रीय अधिकारी- शहर अभियंता

  • एक एकरपुढील बांधकामे - कनिष्ठ अभियंता- उपअभियंता- कार्यकारी अभियंता - शहर अभियंता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT