London to Paris 330 km bicycle journey  sakal
पिंपरी-चिंचवड

Pune : लंडन ते पॅरीस ३३० किमी सायकल प्रवास २४ तासात पूर्ण; पुण्यातील संजय शितोळे देशमुखांचा पराक्रम

युरोप मधे पर्यटन करणे हे भारतीयांसाठी नेहमीच आनंदाचे

रमेश मोरे

जुनी सांगवी : युरोप मधे पर्यटन करणे हे भारतीयांसाठी नेहमीच आनंदाचे असते. एखादा लंडन येथून वेगळ्या वाटेने ते ही सायकलवरून भारताचा झेंडा घेऊन तो थेट आयफेल टॅावरवर फडकावत असेल तर निश्चितच प्रशंसनीय असते.

संजय शितोळे देशमुख यांनी सायकलवरून लंडन ते पॅरिस हा प्रवास २४ तासात पूर्ण केला. ३० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता लंडन मधील टॅावर ब्रिज पासून सुरू केलेले सायकलिंग दुसऱ्या दिवशी १ मे रोजी आयफेल टॅावर येथे २.३० वाजता संपले.

निवडलेला घाटांचा रस्ता, कडकडीत गारठा तापमान ५ ते १९ सेल्सिअस, शेवटचे दोन तास लागलेला पाऊस यावर मात करत ब्रिटिश व जर्मन सहकाऱ्यां सोबत पूर्ण केले. शितोळे सांगतात, लंडन ते ग्रीनविच, केंट, ॲशडाऊन फॅारेस्ट, ससेक्स काऊंटीतील मधील या चढऊताराच्या नितांत रमणीय रस्त्याने घाम काढला.

इंग्लिश चॅनेल न्यूहेवन येथून फेरी बोटीने पार करायला ५ तास लागले, फ्रान्स मधील डीपी बंदरावर ईंग्रजी न कळणाऱ्या फ्रेंच इमिग्रेशन ॲाफीसरबरोबर वादावादीने ३० मिनिटे वाया गेली. पुढील प्रवास सोमे व्हॅली, नॅांर्मडीं या महायुध्दातील अनेक थरारक प्रसंगातील साक्षीदार असलेल्या निसर्गरम्य भूमीतून होता, पण वेळेचे बंधन व चढ उताराने कस लागला.

पॅरीसच्या उपनगरातून आयफेल टॅावरचे टोक पाहिल्यावर,१९४० मधे फ्रान्स जिंकणाऱ्या जर्मन सैन्याला झाला नसेल एवढा आनंद मला झाला. शिल्लक ४५ मिनिटे वेळ व जीपीएस दहा किमी अंतर दाखवत होते, पाऊस जोरदार पडत होता, शरीराने साथ सोडली असताना प्रयत्न पूर्वक मन व श्वासाची लय जोडली गेली व आयफेल टॅावर मोठामोठा होत गेला.

पाऊस थांबत आला होता पण डोळ्यातून अश्रूधारा बरसत होत्या. संजय शितोळे देशमुख हे लंडन मधील अनेक संस्थांशी संबंधित आहेत.यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील व युरोपमधील सर्वोच्च शिखरे पार केली आहेत.तसेच आंतरराष्ट्रीय सायकल मोहिमा केल्या आहेत.याचबरोबर ते गेली २७ वर्षांपासून अय्यंगार योगाचे अभ्यासक आहेत.

शरिर व मनाच्या स्वास्थ्यासाठी योग हा परिपूर्ण व्यायाम आहे.मी अय्यंगार प्रशांत सरांचे योग संस्कार केले.यात प्रो-सायकलचे प्रसाद शाळीग्राम यांनी माझ्या स्कॉट सायकलची व्यवस्था करून प्रोत्साहन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Latest Marathi News Live Update: श्री बालाजी महाराज मंदिरात विराजमान

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

Metro-3: अखेर प्रतिक्षा संपली! मेट्रो-३ चा वरळी-कफ परेड टप्पा ९ ऑक्टोंबरपासून प्रवासी सेवेत, जाणून घ्या तिकीट दर

Kojagiri Horoscope Prediction : उद्या कोजागिरी पौर्णिमेला बनतोय गजकेसरी आणि ध्रुव योग; या पाच राशींवर होणार धनलक्ष्मीची कृपा

SCROLL FOR NEXT