ha.jpg 
पिंपरी-चिंचवड

वादळी वारा, पाऊस...अन् पिंपरीतील कंपन्या...नेमकं झालंय तरी काय...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे एमआयडीसी परिसरातील अनेक कंपन्यांचा वीजपुरवठा एक दिवसांपासून खंडित झाला आहे. अनेक भागात वीज पुरवठा सुरळीत झालेला नसल्यामुळे कंपन्यांचे उत्पादन सुरु होणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

बुधवारी (ता. 3) आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे एमआयडीसी परिसराबरोबरच तळवडे, चिखली, मोशी या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्यामुळे अनेक ठिकाणी सकाळीच वीज गेली होती.

दरम्यान, वीज पुरवठा नसल्यामुळे अनेक कंपन्यांनी दुपारी एकनंतर काम बंद करून कर्मचाऱ्यांना सुटी दिली होती. दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना झाल्यामुळे नागरी वस्त्यांमध्ये देखील वीज गायब होण्याचे प्रकार झाले, त्यामुळे वीजपुरवठा लवकर कसा सुरळीत होईल, यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरु होते. 

दरम्यान, गुरुवार हा उद्योगनगरीतल्या कंपन्यांसाठी सुटीचा वार असतो, त्यामुळे दिवसभरात एमआयडीसी परिसरातील वीज पुरवठ्याचे काम पूर्ण करण्यासाठी कंपन्यानी सकाळपासूनच पाठपुरवठा सुरु केला होता. मात्र, अनेक ठिकाणी वीज पुरवठा सुरु झालेला नव्हता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आणखी एक दिवसांचा अवधी लागला तर शुक्रवारी एमआयडीसी परिसरातल्या कंपन्यांना उत्पादन सुरु करता येणार नाही. आधीच दोन महिन्यांपासून उत्पादन प्रकल्प बंद असल्यामुळे उद्योजक हवालदिल झाले आहेत, त्यामध्ये आता वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे महावितरणने एमआयडीसी परिसरातील वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT