पिंपरी-चिंचवड

पिंपरीतील 'या' बँकेचं तीन दिवसांपासून सर्व्हर डाउन; नागरिकांना मनस्ताप 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मोरवाडीतील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेचे सर्व्हर गेल्या तीन दिवसांपासून डाउन झाल्याने कामकाज बंद होते. आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याचा मनस्ताप हजारो खातेदारांना सहन करावा लागला. खातेधारकांबरोबरच बॅंकेचे अधिकारी आणि कर्मचारीही या प्रकाराने वैतागले होते. 

या बॅंकेतून दररोज जवळपास कोट्यवधी रुपयांची उलाढाल असल्याने मोठी गर्दी असते. परंतु या बॅंकेचे सर्व्हर गुरुवारी अचानक बंद पडले. सकाळी बॅंका उघडल्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली. मात्र, सर्व्हरला येणारी कनेक्‍टिव्हिटी कमी - अधिक प्रमाणात येत होती. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना वेळ लागत होता. या सर्व तांत्रिक अडचणीमुळे बॅंकेचे कामकाज वेळेत पूर्ण होत नव्हते. त्याचवेळी खातेदारांची गर्दी वाढत होती. सकाळपासून बॅंकेत येणाऱ्या खातेधारकांना रक्कम मिळत नसल्याने ओरड सुरू झाली होती. पैसे भरणे, पैसे काढणे, पैसे पाठवणे, खात्याची चौकशीसारखी कामे खोळंबली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही ग्राहकांची रक्कम ट्रान्स्फर झालेली नाही, धनादेश वटविले गेले नाही. त्यासह एका एका कामासाठी तीन-तीन वेळा नोंदणी करावी लागत होती. तासन्‌तास रांगेत ताटकळत थांबत लागत असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला खातेदार हैराण झाले होते. या बाबत खातेधारकांनी बॅंकेच्या मुख्य व्यवस्थापकांकडे धाव घेतली. पण त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी "सकाळ'कडे तक्रारी केल्या. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काही दिवसांपासून कनेक्‍टिव्हिटी नसल्याबाबत बीएसएनएल व आउटसोर्सिंग कंपनीतील अधिकाऱ्यांना कळविले आहे. शुक्रवारी तांत्रिक अडचणी दूर होताच व्यवहार नियमित सुरळीत झाले आहेत.
- रणजित कुमार, मुख्य व्यवस्थापक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, मोरवाडी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: रेल्वेचा प्रश्न सोडवला आता पुढचा प्रश्न पाण्याचा! मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळ काय असतो हेसुद्धा मराठवाडा विसरून जाईल

Latest Marathi News Updates : उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल, मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी

Mohol News : मोहोळ पोलिसांनी उघड केल्या दोन चोऱ्या, लाखाचा माल हस्तगत चोरटा पोलीसांच्या ताब्यात

Nashik News : ५ कोटींचे बक्षीस: नाशिकच्या ग्रामपंचायतींना समृद्ध होण्याची सुवर्णसंधी

Onion Production : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अनुदान मिळणार? कांदा प्रश्नावर समितीकडून सकारात्मक हालचाल

SCROLL FOR NEXT