पिंपरी-चिंचवड

घृणास्पद! महिलेकडे पाहून चालू रिक्षात हस्तमैथुन; पिंपरीमधील घटना

सकाळन्यूजनेटवर्क

पिंपरी : मोरेवाडी येथे रिक्षातून जाताना सहप्रवाशी महिलेकडे पाहून तरुणानं हस्तमैथून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेनं पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. सोहेब इक्बाल कुरेशी असं अटक करण्यात आलेल्या ३० वर्षीय तरुणाचं नाव आहे.  पोलिसांनी आरोपी सोहेब याच्यावर गुन्हाही नोंदवला आहे.

शनिवारी दुपारच्यावेळी पिंपरीतील मोरवाडी येथून रिक्षातून वायसीएम रुग्णालयात पीडित महिला आपल्या मुलाला उपचारासाठी घेऊन जात होती. त्यावेळी तिच्याकडे बघत सोहेब हस्तमैथून करत होता. हा घृणास्पद प्रकार समजल्यानंतर महिलेनं थेट पिंपरी पोलिस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी फिर्यादी महिला शेअरींग रिक्षातून आपल्या लहान मुलाला उपचारासाठी वाय.सी.एम रुग्णालयात घेऊन जात होती. त्यावेळी मोरवाडी येथून रिक्षात बसलेल्या आरोपी सोहेब इक्बाल कुरेशीने अश्लील कृत केलं. रिक्षातील आरशातून फिर्यादी महिलेकडे पहात सोहेबनं हस्तमैथून करत असभ्य व किळसावणे कृत्य केलं. हा सर्व प्रकार महिलेच्या लक्षात आल्यानंतर महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. महिलेच्या तक्रारानंतर आरोपी सोहेब याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईकर मेट्रोच्या प्रतीक्षेतच! मेट्रो-४ लांबणीवर, तर मेट्रो-२बी, ९चा गारेगार प्रवास कधी सुरू होणार? MMRDAची महत्त्वाची माहिती

Solapur Murder: भावाच्या घरात राहणाऱ्या पती-पत्नीचा खून

Solapur Maharashtra Kesari: महिला महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लास मिळणार कार; २८, २९ मार्च रोजी सोलापूर येथे रंगणार कुस्तीचा महासंग्राम

Mumbai Water Supply: सांडपाणी भागवणार मुंबईकरांची तहान, रिसायकल करून पाणी देण्याची BMCची योजना

Kolhapur Ambabai Temple : श्री अंबाबाईच्या ओटीत साडीऐवजी कागदाची रद्दी; भाविकांच्या श्रद्धेशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT