Fire News Esakal
पिंपरी-चिंचवड

Fire News: पिंपरी चिंचवडच्या चिखलीमध्ये हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग; होरपळून ४ जणांचा मृत्यू

मृतांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

पिंपरी चिंचवडच्या चिखलीमधील सचिन हार्डवेअरच्या दुकानाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे.

पिंपरी चिंचवडच्या चिखलीमधील हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ लहान मुलांचाही समोवेश असल्याची माहिती आहे.

दरम्यान ही भीषण आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच हार्डवेअरच्या दुकानामध्ये एक कुटुंब वास्तव्यास असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भीषण आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर आणखी एक व्यक्ती अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, हि आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाचा आहे. पिंपरी चिंचवड अग्निशामक दलानं ही आग नियंत्रणात आणली असून, कुलिंगचे काम सुरु आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पती, पत्नी व दोन मुलांचा यात समावेश आहे. सदर कुटुंब हे मूळचे राजस्थान मधील पाली जिल्ह्यातील आहे. चिमणाराम बेणाराम चौधरी( वय ४८), नम्रता चिमणाराम चौधरी(वय ४०), भावेश चिमणाराम चौधरी (वय १५), सचिन चिमणाराम चौधरी(वय १३) अशी मृतांची नावे आहेत.

सचिन हार्डवेअर असे दुकानाचे नाव आहे. दुकानातून घरात वर जाण्यासाठी जीना होता. दुकानाला शॅार्टसर्कीटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. दुकानात पेंटींगचे डबे असल्याने आगीने तीव्र स्वरुप घेतल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. घरातून बाहेर जाण्यास मार्ग नसल्याने हे कुटुंब आगीत होरपळून मृत्यू पावले. या दुर्घटनेची माहिती पहाटे ५.२३ ला अग्निशामक दलास मिळाली अग्निशामक दलाची चिखलीतील गाडी पाच मिनीटात घटनास्थळी पोहचली परंतु चौधरी कुटुंबाचा त्यापुर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

Pune Traffic: बकरी ईदनिमित्त पुण्यात गोळीबार मैदान परिसरातील वाहतुकीत बदल; अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग जाहीर

E-Scooter : 107 रुपयांत पूर्ण महिना चालेल 'ही' स्कूटर; एप्रिल महिन्यात 17,960 लोकांनी केली खरेदी, एकदा बघाच कमी किंमतीत जबरदस्त गाडी

Maharashtra Marathi Language Row : लोकांना मराठी सक्तीचे धडे देणारे सरकार मंत्रालयातच 'नापास'; प्रवेशद्वारावरील 'तो' फलक पाहून कपाळावर हात माराल!

सरकारी जमिनींवर आता शेती करता येणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पण फक्त एकाच अटीवर, कोणती?

SCROLL FOR NEXT