palm sociaty sakal
पिंपरी-चिंचवड

मीरचंदानी पाल्मस गृहनिर्माण सोसायटी ‘सील’

३२ कोरोना पॉझिटिव्ह सापडले, सोसायटीत भीतीचे वातावरण

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : रहाटणी, कोकणे चौकातील मीरचंदानी पाल्मस या गृहनिर्माण सोसायटीत कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. सलग आठ दिवसात या सोसायटीत ३२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात वयोवृद्ध, लहान मुलांचा समावेश आहे. ही सोसायटी देखील ‘सील’ करण्यात आली आहे.

पिंपळे सौदागर-रहाटणी कोकणे चौक येथील रामबाग कॉलनीत मीरचंदानी पाल्मस ही मोठी गृहनिर्माण सोसायटी आहे. २०० हून अधिक सदनिका आहेत. महापालिका प्रशासनाकडून सोसायटीतील सर्व रहिवाशांची कोरोना अँटीजेन चाचणी केली जात आहे. सोसायटी सील केली जाणार आहे. एकाच सोसायटीत एवढे रूग्ण सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ६०० वर आलेल्या सक्रिय रुग्णांची दुप्पट झाली असून १२०० वर गेली आहे. गेल्या आठवड्यापासून दरम्यान हे रुग्ण आढळले असून त्यात सोसायटीतील सर्वांची चाचणी केली जाणार असून त्यासाठी कॅम्प लावला जाणार आहे.

याबाबत सहाय्यक आरोग्य वैद्यकीय डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले,‘‘रहाटणी कोकणे चौक येथील मीरचंदानी पाल्मस गृहनिर्माण सोसायटीत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. ३२ रुग्ण एकाचदिवशी पॉझिटिव्ह आले नाहीत. २१ ते २७ ऑगस्ट दरम्यान ३२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सोसायटी सील केली असून ‘कंटेन्मेंट झोन’ जाहीर केला आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले आहे. सर्वांची चाचणी केली जात आहे. सर्वांना क्वारंटाईन केले आहे. वैद्यकीय विभाग लक्ष ठेवून आहे.’’

असे आढळले रूग्ण (सोसायटीमधील सात दिवसातील चित्र)

तारीख - कोरोना बाधित

-२१ ऑगस्ट -३

-२२ ऑगस्ट - २

-२३ ऑगस्ट - ४,

-२४ ऑगस्ट -२

-२५ ऑगस्ट -२

-२६ ऑगस्ट -६

-२७ ऑगस्ट- १३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT