Review
Review Sakal
पिंपरी-चिंचवड

खोट्या प्रोफाइलच्या माध्यमातून बनावट रिव्ह्यू तयार करून नागरिकांची दिशाभूल

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - हॉटेल, दवाखाना, विमा, ऑनलाइन शॉपिंग सेंटर, नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून व इतर कोणतीही सोईसुविधा हवी असल्यास बुकिंग करण्यासाठी तत्काळ आपण यूजर रिव्ह्यू (User Review) पाहतो आणि विश्वास ठेवतो. मात्र, हेच रिव्ह्यू सोशल मीडिया (Social Media) व ऑनलाइनवर (Online) फेक टाकण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. यामध्ये अनेक व्यावसायिक वेबसाइट व लिंकचाही समावेश आहे. यातून काही खोट्या प्रोफाइलच्या माध्यमातून बनावट रिव्ह्यू (Review) तयार करून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) सायबर सेलने (Cyber Cell) सांगितले आहे. (Misleading citizens by creating fake reviews through profiles)

शिक्षितवर्ग सध्या ऑनलाइन जास्त प्रमाणात आहे. त्यातूनच हा वर्ग रिव्ह्यू पाहून वस्तू व सेवांचा लाभ घेत आहे. परंतु, शहानिशा करण्याचे कोणतेही माध्यम नसल्याने नागरिक या फसव्या रिव्ह्यूला बळी पडत आहेत. यामध्ये तरुणाईचा सर्वाधिक समावेश आहे. फेक रिव्ह्यूमध्ये चुकीची माहिती भरून नकारात्मक बाबी दर्शविल्या जातात. चुकीच्या पद्धतीने सेवांचे ब्रॅंडिंग करून काही गोष्टी नागरिकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करून ग्राहक आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वस्तू व सेवांचा खप वाढविण्याचा हा फंडा शहरात ठिकठिकाणी वापरला जात आहे.

फेक रिव्ह्यूमध्ये केवळ विक्रेता व ग्राहक या घटकाचा समावेश असतो. परंतु यामध्ये विश्वासार्हता दर्शविण्याचे कोणतेही माध्यम नाही. त्यामुळे गुणवत्ता व किंमती याचा ताळमेळ दिसून येत नाही. एखादी अनोळखी व्यक्ती रिव्ह्यू नोंदवत असल्यास त्या व्यक्तीची प्रोफाइल तपासणी करणे गरजेचे आहे. त्या व्यक्तीने किती वेळा सेवेचा उपभोग घेतला तसेच तारखा व वेळ चुकीची सांगितली का हे तपासणे गरजेचे आहे. नकारात्मक रिव्ह्यूवर संबंधित कंपनीने उत्तर दिले आहे की नाही हे पडताळणे गरजेचे आहे. याकरिता पर्याय म्हणून बनावट रिव्ह्यू कंपनीने जाहिरात करण्यासाठी स्वत:चे चॅनेल, तक्रार निवारण केंद्र, व हेल्पलाइन व ई मेल आयडी दिला आहे का हे अत्यावश्यक आहे.

फेक रिव्ह्यू कसा ओळखाल

  • जबाबदार व्यक्ती आहे का

  • सर्वसामान्य व्यक्ती असल्यास शहानिशा करा

  • त्याच त्या वाक्यांची पुनरावृत्ती व चुका होत आहेत का

  • ओळख लपविली जात आहे का

  • काही मजकूर डिलीट व ब्लॉक केला आहे का?

रिव्ह्यूवर विश्वास न ठेवता कस्टमर केअरकडे संपर्क करणे गरजेचे आहे. खोटे बोलू नये असा कोणताही कायदा नाही, त्यामुळे नागरिक ऑनलाइन फ्रॉड करू लागले आहेत. यावरही कायदेशीर कारवाई करता येते. बऱ्याच ठिकाणी रिव्ह्यू हे जाहिरात स्वरूपात असतात ते समजायला हवेत. यासाठी संगणक तज्ज्ञांचीही तुम्ही मदत घेऊ शकता. परंतु यासाठी जबाबदार व्यक्तीने विधान केले असेल, तरच ते ग्राह्य धरावे.

- संजय तुंगार, पोलिस निरीक्षक, सायबर विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT