पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये टोळक्याकडून पुन्हा दहशत; एकावर प्राणघातक हल्ला

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून दहा जणांच्या टोळक्याने काही जणांना शिविगाळ करीत हाताने मारहाण केली. यासह एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करीत हातातील हत्यारे नाचवीत परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना काळेवाडीतील नढेनगर येथे घडली. 

सोन्या सावंत, विनायक श्रीवास्तव, दीपक सगर, सुशील शिंदे, ओंकार सिद्धराम पांचाळ (वय २३), अनिकेत हातमकर, हैदर शेख (सर्व रा. काळेवाडी) यासह त्यांच्या तीन ते चार साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी संजय पांडुरंग घोडके (रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. मागील आठवड्यात झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिविगाळ केली. तसेच, तेथे उपस्थित असलेल्या साक्षीदारांनाही शिविगाळ करीत हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. 

दरम्यान, साक्षीदार सागर शिंदे हे भांडण सोडविण्यासाठी आले असता, आरोपी विनायक श्रीवास्तव याने त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. तर आरोपी हैदर शेख याने त्यांच्या डोक्यात कुंडी घातली. इतर आरोपींनीही त्यांना मारहाण केली. त्यानंतर हातातील हत्यारे नाचवत परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : कुख्यात गजानन मारणे टोळीतील फरार आरोपी बाब्या पवार अखेर पोलिसांच्या जाळ्यात, दीड वर्षांपासून गंभीर गुन्ह्यांत होता फरार

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT