पिंपरी-चिंचवड

स्वच्छ मोशी प्राधिकरणाची सद्यःस्थिती पाहून तुम्हीही म्हणाल काय हे...

सकाळ वृत्तसेवा

मोशी : प्राधिकरणाच्या सौंदर्यामध्ये भर घालणारा स्पाईन रस्ता सध्या विविध समस्यांनी ग्रासला आहे. जुना वखार महामंडळ चौक म्हणजेच सध्याच्या राजा शिवछत्रपती चौकांमधून या स्पाईन रस्त्याला सुरुवात होते. हा रस्ता तयार करण्यात आला. तेव्हा रस्ता दुभाजकात फुलझाडे लावली होती. मात्र, सध्या येथील ही झाडे अस्ताव्यस्त वाढलेली दिसत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
संत गजानन चौक ते एमआयडीसी पोलिस ठाणे या दरम्यानच्या रस्त्यालगतच्या पदपथांवरील पेव्हिंग ब्लॉक गेल्या अनेक महिन्यांपासून उखडलेले आहेत. त्यामुळे या पदपथावरून नागरिकांना ये-जा करता येत नाही. याच स्पाईन रस्त्याच्या सुरुवातीलाच मधोमध एक मोठा महापारेषणचा उच्च दाब वाहक टॉवर आहे. त्याच्याभोवती महापालिकेने फुलझाडे व शोभेची झाडे लावली होती. मात्र, त्या झाडांची निगा राखली गेली नसल्याने ती अस्ताव्यस्त वाढली आहेत. याशिवाय विविध हॉटेल, खाद्यपदार्थांच्या हातगाडीवाले, विविध वस्तूंची विक्री करणारे व्यावसायिक आपला कचरा या झाडांमध्ये व रस्ता दुभाजकामध्ये टाकतात. त्यामुळे अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. त्याचा त्रास व्यायामासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना नागरिकांना होत आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील पेठ क्रमांक 4, 6, 9 मधील अंतर्गत रस्त्यावरही अनेक ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत. मात्र, काही ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक नसल्यानेही येथील पदपथांची दुरवस्था झालेली आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. याच प्राधिकरण परिसरात पेठ क्रमांक 4 मध्ये एक व पेठ क्रमांक 6 मध्ये एक, अशी दोन कोरोना सेंटर आहेत. या आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मोशी प्राधिकरण परिसरामध्ये सॅनिटायझर किंवा जंतुनाशक फवारणी होणे आवश्यक होते. मात्र, प्राधिकरणातील कोणत्याही पेठेमध्ये कोणत्याही प्रकारचे निर्जंतुकीकरण झालेले नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्याचप्रमाणे या भागातून जाणारी बससेवा नियमित सुरू असली, तरीही स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामधील बस थांब्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. येथील पेठ क्रमांक 6 मध्ये असलेल्या पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये विविध कामांसाठी दररोज शेकडो वाहनचालक आपली वाहने घेऊन येतात. यामधील काही वाहनचालक येथील रस्त्यावरच गुटखा खाऊन थुंकतात. येथेही अनेक हातगाडीवरील व्यावसायिक रस्त्यालगतच कचरा टाकत असल्याचे प्रकारही घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, प्राधिकरणातील अंतर्गत रस्त्यांच्या कडेलाही कचरा, पदपथावरील निघालेले पेव्हिंर ब्लॉक, तसेच रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे अशा विविध समस्यांनी सध्या मोशी प्राधिकरण परिसर समस्याग्रस्त झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यामुळे या समस्यांकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO House: वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपली! सिडकोनिर्मित सोसायट्यांच्या पुनर्विकासाला अखेर गती, सुरक्षित घरांच्या दिशेने पाऊल

Messi Insurance : भारत दौऱ्यात मेस्सी सामना का खेळत नाही? ₹81,000 कोटींच्या डाव्या पायाच्या विम्याचं कारण काय?

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

IPL Mock Auction : ३०.५० कोटी! कॅमेरून ग्रीन ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू... CSK vs KKR मध्ये कोणी मारली बाजी?

धुरंधर Vs छावा! रणवीर सिंहच्या धुरंधरने मोडले सर्व रेकॉर्ड, 10 दिवसांची कमाई वाचून थक्क व्हाल!

SCROLL FOR NEXT