Most of the portable customers have queues outside the mobile gallery to pay outstanding bills in PCMC 
पिंपरी-चिंचवड

मोबाईल क्रमांक पोर्टसाठी ग्राहकांना गाठावी लागते गॅलरी; बील भरण्यासाठी रांगा ऱांगा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : टेलिकॉम रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या नियमांनुसार मोबाईल पोर्ट (MNP) केल्यानंतर पोस्टपेड ग्राहकाला आपला मोबाईल क्रमांक पोर्ट करण्याअगोदर संबंधित कंपनीचे पूर्ण बील भरणे अनिवार्य आहे. मात्र, बहुतांश पोर्टेबल ग्राहकांना "ऑनलाइन' बील कसे भरायचे हेच माहीत नाही, परिणामी "आउटस्टॅडिंग' बिल भरण्यासाठी मोबाईल गॅलरी बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. 

स्पर्धेच्या युगात मोबाईल क्षेत्रात अनेक कंपन्या आहेत. ग्राहकाला चांगली सेवा देण्याचा कंपनीचा प्रयत्न असतो. ग्राहकांना आपल्याकडे ओढण्यासाठी कंपन्यांकडून नवनव्या ऑफर दिल्या जातात. पण काहीवेळा मोबाईल कंपनी बंद होत असल्याने किंवा कंपनीकडून चांगली सेवा न दिल्याने ग्राहक आपला नंबर दुसऱ्या कंपनीत पोर्ट करतात. पोर्ट करताना ग्राहकाला किमान आठवडाभर वाट पाहावी लागत असे, त्यामुळे ग्राहकाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने (trai) या नियमात बदल करीत नंबर पोर्टिग करण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद केली. मात्र नंबर पोर्ट केल्यानंतर अनेकदा जुन्या कंपनीचे बील भरायचे राहून जाते. किंबहुना भरायचे कसे? या विषयी माहिती नसल्याने हजारो ग्राहकांसमोर अडचणी आल्या आहेत. दुसरीकडे संबंधित कंपन्यांकडून सातत्याने बील भरण्याबाबत 'कॉल' येतात. मेसेजचा भडिमार करण्यात येतो. त्यांच्या 'ऍप'मध्येही सुविधा दिलेली नाही. शेवटी त्यांच्याकडून 'आउटस्टॅंडिंग' बिल भरण्यासाठी 'वॉर्निंग' दिली जाते. मुदत संपल्यानंतर बील भरल्यावर मोबाईल सेवा बंद करण्यात येत आहे. दरम्यान, ग्राहकांकडून ऑनलाइनद्वारे पैसे स्वीकारले जात नाहीत. त्यासाठी आवश्‍यक "रिलेशन नंबर'साठी ग्राहकांना मोबाईल गॅलरीतच जावे लागत आहे. त्याशिवाय तुम्ही पेंडिंग बील भरू शकत नाही. कंपन्यांकडून सुटसुटीत माहिती देण्यात येत नसल्याने ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे सध्या मोबाईल गॅलरीबाहेर सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. 

"पुरेशी माहिती नसल्याने पोर्टेबल ग्राहकांसमोर आउटस्टॅंडिंग बील भरण्यासाठी मोठी अडचण येते. दुसरीकडे ऑनलाइनद्वारे पैसे स्वीकारले जात नाहीत. रिलेशन नंबरसाठी गॅलरीत जावेच लागते.'' 
- जितेंद्र सिंग, ग्राहक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये निरीक्षण गृहतून मुलगी बेपत्ता, सुरक्षा यंत्रणेवर उठले सवाल

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Trade Ban : तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT