पिंपरी-चिंचवड

चिखलीत साकारणार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय  

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने चिखली येथे शहरातील सर्वांत मोठे 850 बेडचे मल्टीस्पेशालिटी शासकीय रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावरील ताण कमी होणार आहे. महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये चिखलीतील हॉस्पिटलचा प्रस्ताव ऐनवेळी ठेवण्यात आला. त्याला बहुमताने मंजुरी देण्यात आली. 

चिखलीतील गट क्रमांक 1653 मध्ये सुमारे 20.22 हेक्‍टर जागेचा ताबा महापालिका प्रशासनाला मिळावा, यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले असून, त्यातील सुमारे दोन हेक्‍टर जागेवर प्रशस्त रुग्णालय उभारण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. आता महापालिका सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे रुग्णालय उभारण्याच्या कामाला गती मिळेल. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वैद्यकीय महाविद्यालयाचे नियोजन 
सध्या महापालिकेचे वायसीएम रुग्णालय आहे. त्याची क्षमता सातशे खाटांची आहे. त्या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि प्रशासनावरील ताण कमी व्हावा, या हेतूने शासकीय पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याच धर्तीवर चिखलीत होणाऱ्या प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मनुष्यबळ आणि अन्य कर्मचारी उपलब्ध व्हावेत, या हेतूने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत आमदार लांडगे आग्रही आहेत. या महाविद्यालयात नर्सिंग, डेंटल, फिजिओथेरपी, आयुर्वेदिक असे अभ्यासक्रमांचीही सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. 

ग्रामीण भागाचा फायदा 
सध्याच्या वायसीएम रुग्णालयासह पिंपरी-चिंचवडसह लगतच्या मुळशी, मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या तालुक्‍यांसह अन्य जिल्ह्यातील रुग्णही उपचारासाठी येतात. तुलनेने खेड, जुन्नर, आंबेगाव, मावळ तालुक्‍यातील रुग्णांची संख्या जास्त आहे. त्याचा ताण वायसीएमवर येत आहे. त्यातील उपलब्ध मनुष्यबळ आणि विस्तार क्षमतेला मर्यादा आहेत. त्यामुळे वायसीएमला पर्यायी वैद्यकीय व्यवस्था उभी करणे अत्यावश्‍यक आहे. त्यासाठी चिखलीतील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालय केंद्र बिंदू ठरणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(संपादन : शिवनंदन बाविस्कर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli News: भाजप आमदारांच्या गाडीचा अपघात! दुचाकीची कारला जोरदार धडक, गाडीचा चक्काचूर; नेमकं काय घडलं?

Gangapur Crime : अवैध वाळू व अवैध मुरूम उपसा करणाऱ्या दोन वेगवेगळ्या कारवाईत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT