पिंपरी-चिंचवड

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचाच तीन चोरट्यांकडून खून!

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : खुनाच्या गुन्ह्यात तात्पुरत्या जामिनावर सुटका झालेल्या आरोपीला तीन चोरट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, खुनातील आरोपीने प्रतिकार केल्याने तिघांनी मिळून त्याचा खून केला. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना २३ फेब्रुवारीला आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर घडली होती. 

महादेव श्याम खंदारे (वय ३०) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी संतोष ऊर्फ कांच्या केरबा कांबळे (वय १९, रा. काळेवाडी, देहूफाटा, आळंदी), केतन प्रकाश शिंदे (वय १८, नगरपरिषद जवळील झोपडपट्टी, आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार देविदास ऊर्फ देव्या बबन चौरे (रा. हडपसर) हा पसार आहे. २३ फेब्रुवारीला एका नागरिकाला आळंदीतील इंद्रायणी नदीच्या घाटावर एका व्यक्तीचा मृतदेह दिसला.  याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. मृताच्या मोबाईलवरून त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.

आळंदी पोलिसांनी दोन पथके तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू केला. संतोष आणि केतन या दोघांना संशयावरून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आरोपींनी त्यांच्या देविदास नावाच्या साथीदारासोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. आळंदी घाटावर फिरत असताना महादेव खंदारे यांच्याकडील ऐवज जबरदस्तीने चोरताना त्यांच्यात झालेल्या वादातून हा प्रकार केल्याची कबुली आरोपींनी दिली. खंदारे याच्यावर तळेगाव - दाभाडे पोलिस ठाण्यात २०१६ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यात त्याला अटक झाली असून, तो सध्या कारागृहात होता. कोरोना संसर्ग काळात त्याला तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले होते. तर, आरोपी संतोष आणि केतन हे अल्पवयीन असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल होते. आळंदी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT