murder sakal media
पिंपरी-चिंचवड

डोक्यात फरशी मारून पिंपरीत पत्नीचा खून

मुलीच्या अपहरणासंबंधित केसच्या कारणावरून पतीने पत्नीचा डोक्यात फरशी घालून खून केला. ही घटना पिंपरीतील अजमेरा कॉलनी येथे घडली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - मुलीच्या अपहरणासंबंधित केसच्या कारणावरून पतीने पत्नीचा डोक्यात फरशी घालून खून केला. ही घटना पिंपरीतील अजमेरा कॉलनी येथे घडली. जैनबी अनमुद्दीन चाकूरे (वय ३५, रा. अजमेरा कॉलनी, उद्यमनगर, पिंपरी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.

या प्रकरणी त्यांच्या चौदावर्षीय मुलाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी पती अनमुद्दीन अल्लाउद्दीन चाकूरे (वय ३९) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जैनबी व अनमुद्दीन यांच्यात वाद झाल्याने ते सहा महिन्यांपासून विभक्त होते. दरम्यान, मागील महिन्यात चाकूरे यांच्या मुलीचे अपहरण झाले. याबाबत जैनबी यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर मुलीला सुधारगृहात ठेवले. अनमुद्दीन हा पंधरा दिवसांपूर्वीच पत्नी व मुलाकडे राहण्यास आला होता.

दरम्यान, मंगळवारी (ता. २३) पहाटे तीनच्या सुमारास अनमुद्दीन, जैनबी व त्यांचा मुलगा घरी होते. त्यावेळी मुलीच्या अपहरणासंबंधित केसच्या कारणावरून अनमुद्दीनने जैनबी यांच्या डोक्यात फरशी घातली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पिंपरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एफ-२ वाघिणीचा ‘फॅमिली टाइम’; चार बछड्यांनी वेधलं वन्यजीवप्रेमींचे लक्ष, पाहा VIDEO

Video:'जेसीबी'च्या सहाय्याने शाळकरी मुलांना केलं रेस्क्यू; नागपूरमध्ये पावसाचा हाहाःकार, व्हिडीओ व्हायरल

Pune FDA Action: पुण्यात एफडीएची मोठी धाड: मध्‍यवस्‍तीतील मिठाई, कँडी व चॉकलेटचा ५५ लाखांचा निकृष्ट साठा जप्त

Pune Hinjewadi Metro: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो पहिल्या टप्प्यासाठी सज्ज; सीएमआरएस मंजुरीनंतर उद्‌घाटनाच्या मुहूर्ताकडे पुणेकरांचे लक्ष

Pune Illegal Construction: पुणे महापालिकेची बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई; लोहगाव-खराडीतील २१,४०० चौरस फूट आरसीसी इमारत जमीनदोस्त

SCROLL FOR NEXT