The mystery was solved of the body found in the garbage depot in Moshi 
पिंपरी-चिंचवड

मोशीतील कचरा डेपोत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडले

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : बारा दिवसांपुर्वी मोशीतील कचरा डेपोत सापडलेल्या मृतदेहाचे अखेर गूढ उकलले असून त्या तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. दुसऱ्याने दिलेल्या बिर्याणीवरून दोघांमध्ये झालेल्या भांडणातून हा खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

विनोद मधुकर शिंदे (वय 32, हनुमान मंदिराजवळ, गणेशनगर, गवळी माथा, टेल्कोरोड, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मनोहर शिवाजी कांबळे (वय 23 रा नेहरूनगर, पिंपरी ) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मृताचा भाऊ कैलास शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. बारा दिवसांपुर्वी पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोवर एका अनोळखी पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. मृतदेहाची ओळख पटत नव्हती. मृताच्या डोक्यात किरकोळ जखम होती. दरम्यान, सुरुवातीला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला. भंगार गोळा करणाऱ्यांकडे चौकशी केली असता भोसरी कचरा संकलन केंद्राजवळ नेहमी येणारे दोघेजण अनेक दिवसांपासून गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा शोध घेत त्यातील एकाला ताब्यात घेतले. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोपी मनोहर व मृत विनोद यांच्यात काही दिवसांपुर्वी भांडण झाल्याचे समोर आले. हे दोघेही कचरा गोळा करून उदरनिर्वाह भागवायचे. दरम्यान, त्यांना एकाने बिर्याणी खायला दिली होती. या बिर्याणीवरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यांनी एकमेकांना मारहाण केली. याचा राग आरोपीच्या मनात होता. यातून त्याने विनोद याचा डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिली. अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST 2.0 : नवी गाडी घेताय? जरा थांबा! सेकंडहँड गाड्याही स्वस्त, 'ही' कंपनी देत आहे २ लाखांपर्यंत सूट...

IPhone 17 Crowd: आयफोन १७ विक्री सुरू; बीकेसीच्या स्टोअरबाहेर तुफान गर्दी, रांगेत धक्काबुक्की अन् हाणामारीचा थरार!

RBI Recruitment 2025: रिझर्व बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ग्रेड-बी ऑफिसर पदासाठी १२० जागांची भरती सुरू; जाणून घ्या पगार आणि अर्ज प्रक्रिया

Latest Marathi News Updates : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन

Latur News: प्रसूतीसाठी दाखल झालेल्या माता अन् बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT