Ramrao Maharaj Dhok Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : कीर्तनातून फुलला भक्तीचा मळा

महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींचे पूजन रामायणाचार्य ढोक महाराज यांच्या हस्ते झाले.

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींचे पूजन रामायणाचार्य ढोक महाराज यांच्या हस्ते झाले.

पिंपरी - महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींचे पूजन..., वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टाळ्यांची साथ, पखवाजाचे बोल आणि ‘विठोबा रखुमाई’ भजनात दंग झालेले भाविक अशा वातावरणात आषाढी वारीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवास मंगळवारी प्रारंभ झाला. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी ‘अवघाचि संसार सुखाचा करीन...’ या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगाचे निरूपण केले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींचे पूजन रामायणाचार्य ढोक महाराज यांच्या हस्ते झाले. आषाढी पायी वारीसाठी देहू येथून संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. शनिवारी (ता. ९) सोहळे पंढरपूरमध्ये पोहोचणार आहेत. त्यात सहभागी वारकरी भजन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरणात तल्लीन झाले आहेत. मात्र, जे भाविक काही कारणास्तव पंढरपूरला किंवा वारीला जाऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी आषाढी वारी व आषाढी एकादशीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याचा प्रारंभ चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मंगळवारी झाला. पी. के. इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, वस्ताद विजय नखाते, अरुण काशीद, अभिजित वाघेरे, वेरलेगावचे (जि. सिंधुदुर्ग) माजी सरपंच गोविंद लिंगवत, मेंदू व मनकातज्ज्ञ डॉ. प्रवीण गांजरे, माजी नगरसेवक संतोष बारणे आदी उपस्थित होते. कीर्तनात बाळकृष्ण महाराज गाडे, संतोष महाराज वांगी, भगवान महाराज व निळोबा महाराज यांनी गायन आणि सचिन महाराज इंगळे यांनी पखवाजाची साथ केली. चार दिवस चालणाऱ्या महोत्सवाचा समारोप शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी पाच ते आठ वेळेत होईल. डायबेटिज् फ्री फॉरएव्हर हे कीर्तन महोत्सवाचे सहप्रायोजक आहेत.

बोधले महाराज यांचे आज कीर्तन

बुधवारी (ता. ६) पंढरपूर येथील ज्येष्ठ कीर्तनकार जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन होईल. गुरुवारी (ता. ७) मुंबई येथील कीर्तनकार ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील आणि शुक्रवारी (ता. ८) आळंदी येथील कीर्तनकार ह. भ. प. आसाराम महाराज बडे यांचे कीर्तन होईल.

अवघाचि संसार सुखाचा करीन

रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या,

अवघाचि संसार सुखाचा करीन ।

आनंदें भरीन तिन्ही लोक ॥ जाईन गे माये तया पंढरपुरा ।

भेटेन माहेरा आपुलिया ॥ सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन ।

क्षेम मी देईन पांडुरंगी ॥ बाप रखुमादेविवरु

विठ्ठलेचे भेटी । आपुले संवसाटी करुनी राहे ॥..‌.

या अभंगाचे निरूपण त्यांनी केले. ते म्हणाले, ‘‘सर्व वारकरी सध्या पंढरीच्या वाटेवर आहेत. संतांच्या पालख्यांसमवेत भाविक चालत आहेत. कारण, जगत हे न्यायालय आहे. परम परमात्मा ईश्वर पांडुरंग न्यायाधीश आहेत. संत हे वकील आहेत. आणि सामान्य जन आरोपी आहेत. आरोपीला आरोपातून मुक्त होण्यासाठी न्यायाधीशांकडे जावे लागते. ते काम वकीलरुपी संत करतात. मग काहीजण आळंदीच्या वकिलासोबत जातात. काही देहूच्या वकिलासोबत जातात. ते आता पंढरीच्या वाटेवर आहेत. सकल संतांचे माहेर पंढरपूर आहे. आणि संत व ग्रंथांमुळे आपला हिंदुस्थान श्रीमंत आहे. हा देश संस्कारांचा आहे. हा संस्कार वारकरी संप्रदाय व संतांनी दिला आहे.’’ रामायण व महाभारतातील दाखले देत त्यांनी विद्यमान परिस्थितीचे वर्णन केले.

आषाढी वारीनिमित्त आयोजित हा कीर्तन महोत्सव हे चंदन आहे. त्याचा सुगंध दरवळतो आहे. कारण हे ठिकाण एक मंदिर आहे. मंदिर म्हणजे मंगलता, दिव्यता व रम्यता आहे. त्यात दरवळणारा सुगंध म्हणजे कीर्तन. यातून पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अलंकापुरीचे संत ज्ञानेश्वर माउली यांचा अभंग घेतला आहे. लंकापूरचा राजा रावण होता. पण, अलंकापूरचा राजा संत ज्ञानेश्वर माउली आहेत. म्हणूनच त्यांनी, ‘अवघाचा संसार सुखाचा करीन’ अशी प्रतिज्ञा केली आहे. ‘भेटेन माहेरा आपुलिया’ म्हणत ते पंढरपूरला आनंदाने निघाले आहेत. कारण, ते सर्वांचे माहेर आहे. आणि माहेरीच सुख आहे. म्हणूनच पंढरपूरची वारी करायची असते.

सकाळ विभागीय कार्यालय

  • ‘बी-झोन’ बिल्डिंग, ५ मजला, ऑफिस नं. 507 ते 510,

  • जुना पुणे-मुंबई महामार्ग, एम्पायर इस्टेटजवळ,

  • पिंपळे पेट्रोलपंपाशेजारी, पिंपरी. संपर्क : ९८८१०९९४३५

प्रवेशिकांसाठी संपर्क

आदित्य - ९९२२२४७५५६

रोशन - ९५४५९८११५९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs SA : नुसता धुरळा... Phil Salt चे वेगवान T20I शतक अन् जॉस बटलरच्या १५ चेंडूंत ७४ धावा; इंग्लंडचा रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर, मोडला भारताचा विश्वविक्रम

Elphinstone Bridge : मुंबईतील एलफिस्टन पुलावर अखेर हातोडा

Pune ZP : राज्यामध्ये ३४ ठिकाणी अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; पुणे ‘झेडपी’साठी खुला प्रवर्ग, सतरा ठिकाणी महिलांसाठी आरक्षण

Karnataka accident during Ganesh Visarjan: कर्नाटकात भीषण दुर्घटना! गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव ट्रक घुसला; आठ जणांचा मृत्यू

Rafale fighter jets India: आता शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या 'राफेल' लढाऊ विमानांची भारतात निर्मिती होणार!

SCROLL FOR NEXT