पिंपरी-चिंचवड

नाणे मावळातील पठारांवरील रहिवासी पायाभूत सुविधांपासून कोसोदूर; काय आहे सद्य:स्थिती जाणून घ्या

दिनेश टाकवे

करंजगाव (ता. मावळ) : स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही नाणे मावळातील डोंगर माथ्यावर आजपर्यंत रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधा पोहोचल्या नाहीत. त्यामुळे तेथे राहणारे रहिवासी अनेक हालअपेष्टा सहन करीत जीवन जगत आहेत. सरकारने आता तरी त्यांना या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी तेथील रहिवाशांनी केली आहे.

नाणे पठार, कांबरे (नामा) पठार, करंजगाव पठार, पाले पठार, सांगिसे पठार, उकसान पठार, कुसवली-कुसुर पठार, कांबरे (आमा) पठार व सटवाईवाडी आदी गावांचा त्यात समावेश होतो. पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या या भागात सध्या पाण्याच्या समस्येने उग्ररूप धारण केले आहे. याठिकाणी नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी तास-तासभर पाणवठ्यावर ताटकळत बसावे लागत आहे. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत तीव्र उन्हाळ्यामुळे आटले आहेत. पठारावर जाण्यास पक्के रस्ते नाहीत. पावसाळ्यात पायवाट सुद्धा धोकादायक बनते. त्यामुळे सरकारने हे प्रश्न सोडवावे, अशी मागणी नामदेव शेडगे, संदीप शेडगे, बाळू हिरवे, पांडुरंग ठिकडे, राजू ठिकडे, रामभाऊ आखाडे, दत्ता आखाडे, विठ्ठल शेडगे, बाबुराव शेडगे, पप्पू शेडगे आदी पठारवासीयांनी केली आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सेवाभावी संस्थांचा हातभार

पठारावरील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी, याहेतूने मावळ तालुक्यातील काही सेवाभावी संस्था काम करत असल्याचे दिसून येत आहे. या सेवाभावी संस्थांमध्ये देवराई, बजरंग दल मावळ, मावळ विचार मंच, मावळ प्रबोधिनी आदी संस्थांचा समावेश आहे. या संस्थांच्या माध्यमातून काही प्रमाणात विकास कामे करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ही आहे खरी समस्या...

नाणे मावळातील असलेली ही विविध पठारे व तेथील रहिवासी विविध गावांच्या हद्दीत विभागली गेली आहे. परिणामी एक-एका गावाच्या हद्दीत पठारावरील मोजकीच घरे येतात. परिणामी कमी मतदारांसाठी कोणत्याच ग्रामपंचायतीच्या वतीने योग्य प्रमाणात दखल घेतली जात नाही. त्यामुळे या नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत.

रहिवाशांची ही मागणी...

संपूर्ण डोंगरावरील विविध पठार मिळून जर एक वेगळीच म्हणजेच नाणे मावळ पठार या अनुषंगाने नविन स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करणे. त्यामाध्यमातून शासकीय निधी उपलब्ध करून त्याचा उपयोग पठारावरील जनतेला होईल, अशी मागणी काही नागरिक सरकार दरबारी करण्याची मागणी करीत आहेत.

रस्त्याचा प्रश्न गंभीर

पठारावर जाण्या-येण्यासाठी प्रत्येक पठाराची एक स्वतंत्र पायवाट आहे. पण या वाटेवरचा प्रवास हा जीवघेणा आहे. डोंगरकडा चढून वर जाताना किंवा खाली उतरताना लोकांना जीव मुठीत धरावा लागतो. शाळकरी मुलं, कामगार यांना बॅग घेऊन तर दूध व्यावसायिकांना दुधाचे कॅन घेऊन दररोज हा जीवघेणा प्रवास करावा लागतो. एका वाडीवरून दुसऱ्या वाडीवर जातानाचा असलेला रस्ता हा केवळ धुळीचा आहे. यावरून ये-जा करताना येथील रहिवाशांना अनेक अडचणी येतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मुलं म्हणतील, आई-वडिलांनी पैसे घेऊन मत विकले... राज ठाकरेंनी सांगितलं लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचं गणित?

ZP Election Date News : जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी? इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता

Ajit Pawar Pune Manifesto: पुण्यात मोफत मेट्रो अन् मोफत बस देणार, अजित पवारांचं पुणेकरांना आश्वासन! दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Gold Rate Today : खरेदीदारांना धक्का! अमेरिकेच्या ‘मी’पणामुळे सोनं-चांदी उसळली; आज खरेदी करायची असेल तर आधी हे दर पाहाच!

WPL 2026 मध्ये आज Gujarat Giants चा UP Warriors विरुद्ध सामना, मागील कामगिरी सुधारण्याकडे दोन्ही संघाचं लक्ष्य; आज कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT