पिंपरी-चिंचवड

...हा तर पिंपरी-चिंचवडचा अभिमान

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : भोसरी एमआयडीसीतील राष्ट्रीय एड्‌स संशोधन संस्थेत (नारी) आता कोरोना संसर्गाची तपासणी होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे महापालिकेला मोठी मदत होणार आहे. 

विशेष म्हणजे सध्या कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू असलेले वायसीएम रुग्णालय आणि भोसरी रुग्णालय यांच्यामध्ये 'नारी' असून, दोन्ही रुग्णालयांपासून हाकेच्या अंतरावर आहे. यामुळे रुग्णांचे  रिपोर्ट लवकर मिळून तत्काळ उपचार करण्यास मदत होईल.

सध्या पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) रुग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. या संस्थेकडे पुणे शहर व जिल्ह्यासह विविध भागातून नमुने तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे नमुन्यांची तपासणी करून रिपोर्ट यायला बारा तासांपेक्षा अधिक कालावधी लागत आहे.   

'नारी'ला कोविड तपासणी करण्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी प्रयत्न केले होते. 
शुक्रवारी (ता. 1) महापालिकेने आठ संशयितांचे नमुने तपासणीसाठी नारीकडे पाठविले होते. ते निगेटिव्ह आले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

शहरातच होणार चाचणी : आयुक्त
 शहरामध्ये कोरोनाची तपासणी तत्काळ व्हावी, यासाठी वायसीएममध्ये 'आर्टीफिशियल' मशिन विकत घेण्याच्या प्रयत्नात आहोत. त्याची निविदा प्रसिद्ध केली आहे.  भोसरीतील 'नारी'संस्था 'आयसीएमआर'चीच संस्था आहे. 'नारी'संस्थेमार्फत कोरोनाची चाचणी व्हावी, यासाठी आयसीएमआरला विनंती केली होती. त्याला मान्यता मिळाली आहे. लवकर त्यांच्याकडे अधिक क्षमतेने चाचण्या सुरु होतील.

जेणेकरून एनआयव्हीकडे पुण्यासह आजबाजूच्या जिल्ह्यामुळे लोड आल्यास आपल्याला शहरातच कोरोनाच्या तपासण्या करण्यासाठी एक यंत्रणा उपलब्ध होत आहे.  'नारी'त सुरुवातीला कमी चाचण्या होतील. त्यानंतर हळूहळू त्यांची क्षमता वाढेल. त्यानंतर सुरळीत कामकाज होईल, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT