पिंपरी-चिंचवड

मावळात आज कोरोनाबाधितांचा आकडा वाढला 

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने पॉझिटिव्ह रुग्णसंख्याही वाढू लागली आहे. गुरुवारी दिवसभरात नव्याने १२३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर कोरोनाबाधित दोघांचा मृत्यू झाला. लोणावळा येथील ६२ वर्षीय पुरुष व कामशेत येथील ४३ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या तीन हजार ४१७ झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत १०९ जणांचा मृत्यू झाला असून, दोन हजार ४४५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या १२६ जणांमध्ये लोणावळा येथील सर्वाधिक ३८, तळेगाव दाभाडे येथील २४, वडगाव येथील दहा, कामशेत येथील सात, कान्हे येथील सहा, कुरवंडे येथील चार, इंदोरी, सुदुंबरे, शिरगाव व जांभूळ येथील प्रत्येकी तीन, कुसगाव बुद्रुक, सोमाटणे, वराळे, नवलाख उंब्रे, कुणे नामा, कार्ला व वरसोली येथील प्रत्येकी दोन; तर माळवाडी, चांदखेड, टाकवे बुद्रुक, बधलवाडी, सुदवडी, आढले खुर्द, नाणे, कुसगाव खुर्द, आंबळे, मंगरूळ व बोरवली येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. 

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार ४१७ झाली असून, त्यात शहरी भागातील एक हजार ९७१, तर ग्रामीण भागातील एक हजार ४४६ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक एक हजार ५६, लोणावळा येथे ६९१ व वडगाव येथे रुग्णसंख्या २२४ एवढी झाली आहे. आतापपर्यंत १०९ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन हजार ४४५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी १३८ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ८६३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ५४४ जण लक्षणे असलेले व ३१९ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ५४४ जणांपैकी ३८५ जणांमध्ये सौम्य, तर १५० जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. नऊ जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ८६३ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT