पिंपरी-चिंचवड

मावळात दिवसभरात ४५ नवे पॉझिटिव्ह, तर चौघांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात रविवारी दिवसभरात ४५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर चौघांचा मृत्यू झाला. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या एक हजार १०९, तर मृतांची संख्या ३५ झाली आहे. ६८५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

सुदुंबरे येथील ९७ वर्षीय, ब्राम्हणवाडी येथील ६७ व ५७ वर्षीय पुरुष, तर तळेगाव येथील ६४ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. त्यांना इतरही काही आजार होते.  रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ४५ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक नऊ, लोणावळा येथील सहा, वडगाव, वराळे, गहुंजे, बेबडओहळ व शिवणे येथील प्रत्येकी तीन, सुदुंबरे व नवलाख उंब्रे येथील प्रत्येकी दोन; तर ब्राम्हणवाडी, कामशेत, माऊ, ऊर्से, धामणे, इंदोरी, कान्हे, शिरगाव, चिखलसे, वहाणगाव व वाकसई येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक हजार १०९ झाली असून, त्यात शहरी भागातील ५४६, तर ग्रामीण भागातील ५६३ जणांचा समावेश आहे. तळेगावात रुग्ण संख्येचा ओघ सुरूच असून, तेथील संख्या ३६४ झाली आहे. लोणावळा येथे १०५, तर वडगाव येथील रुग्ण संख्या ७७ झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ६८५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी ५४ जणांना घरी सोडण्यात आले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तालुक्यात सध्या ३८९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २६३ जण लक्षणे असलेले व १२६ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २६३ जणांपैकी १९४ जणांमध्ये सौम्य तर ५४ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १४ जण गंभीर, तर एक जण अत्यवस्थ आहे. सध्या ३६५ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असून, २४ जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Leader Arrest : राज ठाकरेंच्या शिलेदाराला फसवणूक प्रकरणात अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Yuzvendra Chahal Retirement : युझवेंद्र चहलने अचानक घेतली निवृत्ती; पोस्टने खळबळ, म्हणाला, माझ्यात अजूनही क्रिकेट शिल्लक, पण...

Mumbai News: शौचालयातील विषारी वायूमुळे 2 तरुणांचा मृत्यू; गोरेगावातील 'त्या' कारखान्याला टाळे ठोकण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : कॅप्टन स्मित मच्छार यांचा 'अशोक चक्रा'साठी विचार करावा, मिलिंद देवरा यांची पंतप्रधान मोदींना विनंती

Captain Smit Machhar: ‘कॅप्टन स्मित, धन्यवाद!’; इस्रायलकडून मुंबईत होर्डिंग्जद्वारे भारतीय वैमानिकाला सलाम

SCROLL FOR NEXT