Rajesh Patil Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचा नवीन आदेश

अत्यावश्यक सेवेशी संबंधित उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना औषध मालाचा पुरवठा करणारी दुकाने केवळ त्याच कारणासाठी सुरू ठेवावेत. इतर किरकोळ विक्री करता येणार नाही.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - अत्यावश्यक सेवेशी संबंधित उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना औषध मालाचा पुरवठा करणारी दुकाने केवळ त्याच कारणासाठी सुरू ठेवावेत. इतर किरकोळ विक्री करता येणार नाही. त्यांनी पॉइंट टु पॉइंट विक्री करावे. ई-कॉमर्स मार्फत घरपोच सुविधा देणारे कर्मचारी, हॉटेल, बार, रेस्टॉरंटचे कर्मचारी, त्यांच्यामार्फत घरपोच सुविधा देणारे कर्मचारी, खाजगी वाहतूक करणारे वाहन चालक किंवा मालक, वर्तमानपत्रांचे कर्मचारी यांना आरटीपीसीआर चाचणीची गरज नाही. घरकामगार, वाहनचालक, स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिक आणि घरी आजारी असणाऱ्यांची सेवा करणारे वैद्यकीय मदतनीस यांनी लसीकरण करून घ्यावे.

  • शहरातील खानावळी फक्त पार्सल सेवेसाठी सकाळी सात ते सायंकाळी आठ या वेळेत सुरू राहतील.

  • मद्य विक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार होम डिलिव्हरीसाठी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहतील.

  • चष्म्याची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत सुरू राहतील.

रमजानच्या पार्श्वभूमीवर 14 मेपर्यंत नवीन नियमावली

संसर्ग टाळण्यासाठी नमाज पठण घरातच करावे. एकत्र येऊ नये. सहेरी व इफ्तारच्या वेळी फळ विक्रेत्यांकडे गर्दी करू नये. रमजान महिन्यात शेवटच्या शुक्रवारी दुवा पठाण घरातच करावे. शब-ए- कद्र ही रमजान महिन्यात २६ व्या दिवशी साजरे करण्याची प्रथा आहे. मात्र, नमाज संपल्यानंतर ती घरात राहूनच साजरी करावी. संचारबंदी असल्याने फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत. विनाकारण रस्त्यावर फिरू नये. मिरवणुका काढू नयेत. धार्मिक स्थळे, सभा, संमेलने बंद ठेवावे. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT