पिंपरी-चिंचवड

Video : पिंपरी-चिंचवड शहरात रोजगार देणाऱ्यांपुढेच निर्माण झालंय 'हे' मोठं संकट! 

अवधूत कुलकर्णी

पिंपरी : लॉकडाउनच्या आधीपर्यंत शहरातील अनेक खासगी एम्प्लॉयमेंट एक्‍स्चेंज व्यावसायिक रोज प्रत्येकी किमान 20 ते 25 जणांना कोणत्या ना कोणत्या कंपनीत नोकरी मिळवून देत होते. मात्र, लॉकडाउन सुरू झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून ते स्वत:च बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे काही जणांपुढे जगण्याचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर असल्याने शहराच्या परिसरातील अनेक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची सातत्याने गरज असते. या कंपन्यांना आवश्‍यक मनुष्यबळ घेण्यासाठी संबंधित कंपन्यांकडे अनेकदा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविणे त्यातून योग्य उमेदवाराची निवड करणे यासाठी पुरेसा वेळ नसतो. त्यासाठी अशा कंपन्या खासगी एम्प्लॉयमेंट एक्‍स्चेंज व्यावसायिकांची मदत घेतात. असे व्यावसायिक नोकरी करू इच्छिणाऱ्याकडून एक अर्ज भरून घेतात. त्याचे शिक्षण, अनुभव यानुसार त्याला योग्य कंपनीत मुलाखतीसाठी पाठवितात. त्यासाठी संबंधित उमेदवाराकडून शुल्क घेतात. 


कोणत्या उमेदवारांना प्राधान्य 

सामान्यपणे कंपन्यांना तंत्रकुशल कामगारांची जास्त गरज असते. त्यामध्ये माहिती-तंत्रज्ञान, अभियांत्रिकी पदविका, पदवीधर, औद्योगिक तंत्रशिक्षण संस्थेमधून शिक्षण घेतलेले तंत्रकुशल कामगार यांचा समावेश असतो. कंपनीकडून ज्या कामगारांची जेवढी मागणी येईल. त्याप्रमाणात संबंधित कंपनीत उमेदवारांना नोकरीच्या मुलाखतीसाठी पाठविले जाते. 

काय असते पद्धत 

काही वेळेस एखाद्या कंपनीकडून अशा व्यावसायिकास मोठ्या प्रमाणात कामगारांची मागणी नोंदविली जाते. मात्र, त्या-त्या प्रकारचे कामगार एकाच व्यावसायिकाकडे पुरेसे नोंदलेले असतातच असे नाही. अशा वेळी हे व्यावसायिक त्यांच्या समव्यावसायिकांकडे उमेदवारांच्या माहितीचे आदानप्रदान करतात. त्याचा दोघांनाही फायदा होतो. 

सध्याची स्थिती काय?

लॉकडाउनमुळे अनेक व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. घरांच्या कर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण कसे करायचे असे प्रश्‍न त्यांच्यापुढे आहेत. ज्यांच्याकडे चांगली बचत आहे त्यांचे काहीसे ठीक चालले आहे. मात्र अन्य काहीजणांची अवस्था यथातथाच आहे. एम्प्लॉयमेंट एक्‍स्चेंज व्यावसायिक सतीश म्हेत्रे यांनी सांगितले, "लॉकडाऊनमुळे जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे घाऊक भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.'' अन्य एक व्यावसायिक प्रवीण गव्हाणे यांनी सांगितले, "कंपन्या जरी सुरू झाल्या असल्या तरी कायम असलेल्या कामगारांपैकी 33 टक्के कामगारच कामावर बोलाविण्याची परवानगी आहे. त्यामुळे शिकाऊ आणि फ्रेशरला नोकरीची संधी जवळपास नाही. मुलांचे पालकही कोरोनाच्या भीतीमुळे नोकरीवर पाठविण्यास राजी नाहीत.'' 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आकडे बोलतात... 

  • शहरातील व्यावसायिकांची संख्या - 100 
  • महिन्याला प्रत्येकाकडून रोजगार मिळविणाऱ्यांची संख्या - 250 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लॉकडाउनच्या आधीपर्यंत व्यवसाय सुरळीत होता. मात्र, लॉकडाउन सुरू झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यात कंपन्याच बंद असल्याने एकाही उमेदवाराला नोकरी मिळवून देता आली नाही. आता कंपन्या सुरू झाल्यानंतर त्यांच्याकडून दिवसाला एक ते दोन उमेदवारांचीच मागणी करण्यात येत आहे. मात्र अनेकजण गावाला गेल्याने तेवढेसुद्धा उमेदवार मिळत नसल्याचे चित्र आहे. 

- विशाल खुळे, खासगी एम्प्लॉयमेंट एक्‍स्चेंज व्यावसायिक, चिंचवड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT