पिंपरी-चिंचवड

मावळ : टाकव्यात नऊ महिन्यांच्या बाळाला कोरोना

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक (बेलज रोड) येथील एक नऊ महिन्यांचे बालक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली. खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या हायरिस्क संपर्कातील सात व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. नजीकचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहिर करण्यात आला आहे. 

बेलज रोडवर राहणाऱ्या कुटुंबातील नऊ महिन्यांचे बालक आजारी असल्याने त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांनी तपासणीसाठी त्याला सोमवारी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवले होते. हे बालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. लोहारे यांच्यासह तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांनी या कुटुंबाच्या घरी जाऊन बालकाच्या हाय रिस्क संपर्कात आलेल्या सात जणांना तपासणीसाठी तळेगाव दाभाडे येथील होर्टीकल्चर ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठवून दिले. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आसपासचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: सुंच आठ वर्षांपासून चालवत होता किडनी विक्रीचे रॅकेट; एका किडनीमागे सव्वा कोटी, मुलीच्या वडिलांनीही दिला होता नकार!

Viral Video : रोहित भाऊ, वडापाव खाणार का? प्रेक्षकांमधून मिळाली आवडत्या पदार्थाची ऑफर; भारी होती हिटमॅनची रिअ‍ॅक्शन

Shukra Gochar 2026: वर्षाच्या पहिल्याच गोचरमध्ये ‘या’ राशींचं नशीब फुलणार, करिअरला मिळणार मोठी उंची

Vijay Hazare Trophy : पहिल्याच दिवशी २२ शतकं, गोलंदाजांची धुलाई; फलंदाजांनी मोडले अनेक विक्रम

पहिल्याच सामन्यात शतक, आता विराट कोहली, रोहित शर्मा यांचा Vijay Hazare Trophy मधील पुढील सामना कधी? वाचा सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT