पिंपरी-चिंचवड

चिंचवड परिसरात चार तास वीज गायब!

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महावितरण कंपनीची केबल शॉर्ट झाल्याने चिंचवड येथील पवनानगर आणि एसकेएफ कंपनी परिसरातील वीजपुरवठा रविवारी दुपारी जवळपास चार तास खंडित झाला. त्यामुळे आधीच उन्हाळ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली. 

साधारणपणे दुपारी साडेबारानंतर या परिसरातील केबल शॉट झाली. या परिसरात वरचेवर केबल शॉर्ट होत असल्याने विद्युत पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे केबल बदलण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी महावितरण कंपनीकडे केली.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पवनानगर येथील स्थानिक ज्येष्ठ नागरिक अरुणा मराठे म्हणाल्या, "सकाळपासून वीज नाही. दुपारी तीन वाजता येईल, असे महावितरण कंपनीकडून कळविण्यात आले होते. मात्र, सायंकाळी सहा वाजले तरी वीज आलेली नाही.'' यासंदर्भात महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : राज्यातील दुष्काळावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट बघू नका’

SCROLL FOR NEXT