Crime-on-without-Helmet 
पिंपरी-चिंचवड

हेल्मेट नाही, तर मग होणार कडक कारवाई

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनचालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडक करवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. जानेवारीमध्ये तब्बल १७ हजार ८०६ चालकांवर दंडात्मक कारवाई करून ८९ लाख ३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहेत. बहुतांश अपघातांमध्ये दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान न केल्याने डोक्‍याला मार लागून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कडक उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी हेल्मेट परिधान न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात नव्हती. मात्र, आता वाहतूक शाखेने कारवाई सुरू केल्याने चालकांना हेल्मेट परिधान करूनच घराबाहेर पडावे लागणार आहे. 

आयुक्तालयाच्या हद्दीत मागील दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात कारवाई झाली. यापुढे देखील कारवाई सुरू राहील, असे वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी सांगितले. 

नियमाप्रमाणे वाहन चालविताना हेल्मेट परिधान करणे आवश्‍यकच आहे. या नियमाची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. हेल्मेटची सक्ती किंवा पोलिस दंड करतात म्हणून नव्हे, तर नागरिकांनी स्वत:च्या जिवासाठी हेल्मेट परिधान करायला हवे. 
- श्रीकांत डिसले, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic jam : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी; खंडाळा बोगद्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : शिवजयंतीनिमित्त सिंहगड घाटात रांगोळीच्या पायघड्या

Sugar Factory : कारखाने वर्षभर सुरू ठेवण्यासाठी हालचाली, मल्टिफीडसाठी ६३ कारखान्यांचा पुढाकार

T20 WC, IND vs NED: ...अन् मोठा अनर्थ थोडक्यात टळला! सूर्यकुमार - रिंकू सिंगची जोरात धडक अन् चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; Video

Chhatrapati Shivaji Maharaj:विदर्भभूमी शिवरायांच्या पदस्पर्शाने ६ वेळा पावन, आग्रा कैदेतून सुटल्यानंतर विदर्भातून प्रवास

SCROLL FOR NEXT