Now animals will be bought and sold online
Now animals will be bought and sold online 
पिंपरी-चिंचवड

सायकल, कार नव्हे तर, आता जनावरांची खरेदी-विक्रीही ऑनलाईन

दिनेश टाकवे

करंजगाव (पिंपरी) : ''कोरोनामुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य परिस्थितीत राज्यात जनावरांचे खरेदी-विक्री होणारे बाजार बंद आहेत. सध्या कार्यान्वित असणारेही जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पद्धतीने किंवा फोनवरुन जनावरे खरेदी करावेत.''अशी शासनाची भूमिका असल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेकांच्या गोठ्यातले दूध कमी झाल्याने त्यांच्यासाठी जुनी जनावरे विकून नव्याने व्यालेली जनावरे खरेदी करणे आवश्यक असताना टाळेबंदीमुळे सगळे व्यवहार ठप्प झाले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना  ऑनलाईन खरेदीने मोठा दिलासा दिला आहे. मोबाईल व लॅपटॉपच्या मदतीने शेतकरी राज्यातील चाकण, लोणी, बारामती तर गुजरात, हरियाणा येथील व्यापारी अथवा शेतकऱ्यांशी तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन खरेदी-विक्री करत आहेत.अनेक अशिक्षित शेतकऱ्यांना शाळेत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या नातवांचा या कामात मदत होत आहे.       

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
                         
जनावरांची ऑनलाईन  खरेदी विक्री मोबाइल अ‍ॅपद्वारेही
पशुपालक शेतकऱ्यांना मध्यस्थ दलालांशिवाय जनावरांची खरेदी-विक्री करता यावी आणि होणारा वाहतूक खर्च वाचावा याकरिता अनेक मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. अनेक मोबाइल अ‍ॅप हे विनामूल्य असून अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहेत. पशुपालक शेतकऱ्यांना जनावरांची स्वखर्चाने वाहतूक करत बाजारात खरेदी-विक्री केली जाते. बाजारात पशुंची खरेदी-विक्री ही प्रामुख्याने दलालांमार्फत होत असते. त्यामुळे पशुपालकाला अपेक्षित किंमत मिळण्याची शाश्वती नसते शिवाय, कमीशनही मोजावे लागते. पशुपालकांची दलालांमार्फत होणारी फसवणूक टळावी यासाठी ऑनलाईन पध्दत फायदेशीर ठरत आहे. सध्या प्रत्येक शेतकऱ्यांकडे  मोबाइल असल्याने त्यांना ऑनलाईनने सहजपणे जनावरांची खरेदी-विक्री करता येत आहे.                  

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
                     
खरेदी करताना घ्यायची काळजी                  
दुधासाठी जनावरे खरेदी करत  निरोगी गाय अगर म्हैस खरेदी करावी.ती जातीवंत, उच्च प्रतीची व अधिक दूध देणारी असावी.  जातीवंत जनावरांची निवड करणे फायद्याचे ठरते. अनुभवी व्यक्तीच्या सहाय्याने आठवडे बाजारातून शेतकरी जनावरे घेत असताना कोरोनाच्या संकटात जनावरे प्रत्यक्ष पाहायला मिळत नसल्याने ओळखीच्या व्यक्तींकडून खरेदी करणे गरजेचे आहे.अन्यथा फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही.        

फसवणुकीची शक्यता                  
कामशेत येथील शेतकऱ्याने ऑनलाईन पद्धतीने गाई खरेदीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर गाई घरी सुखरूप पोहचली.व्यापाऱ्याला पैसे ऑनलाईन ट्रान्स्फर झाले. मात्र, गाई घरी आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी तिची पाहणी केली असता गाई डोळ्यांनी अंध असल्याचे समजले.  

पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे कोरोनामुळे निधन

ऑनलाईनचे फायदे     

१)घरबसल्या जनावरे पाहण्याची संधी                                       
२)वाहतुक/प्रवास खर्च व वेळ वाचतो
 ३)कोरोनाचा संसर्ग टळतो,कोरोनापासून दोन हात दूर 
४)रोखीचा व्यवहार टळतो.         
 
            
''ऑनलाईनचा व्यवहार करत असताना जनावरांची शारीरिक समस्यांबाबत फसवणुकीचे प्रकार घडत आहेत.याशिवाय ऑनलाईन पैसे पाठवल्यावर जनावरांची गाडी वेळेत न पाठवून काही व्यापारी ते पैसे दोन-दोन महिने वापरतात.त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी ऑनलाईन व्यवहार करताना खात्रीच्या व जुने हितसंबंध असणाऱ्या व्यक्तींच्या मदतीने व्यवहार केले पाहिजे.''        
- वामन नाणेकर,शेतकरी , नाणे मावळ.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ►
 क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT